गेल्या ८ महीन्यापासुन फरार असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी धारदार शस्त्रासह जेरबंद ! गुन्हे शाखा युनिट-१ ची कामगिरी…..!

लाल दिवा-नाशिक,ता.४:-आडगाव पोलीस स्टेशन गुरनं १३१/२०२३, भा.द.वि कलम ३०२, ३४ प्रमाणे दिनांक ३०/०४/२०२३ रोजी गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयातील मुख्य पाहीजे आरोपी नामे विजय पाटील हा गुन्हा दाखल झाल्यानंतर ८ महीन्यापासुन अदयापपर्यंत फरार होता. तो फरार झाल्यापासुन त्याचा गुन्हे शाखा युनीट १ पथक हे त्याचा सातत्याने शोध घेत होते.

 

सदर आरोपी यास कोठल्याही परीस्थीतीत पकडण्याबाबत मा. पोलीस आयुक्त साो. संदीप कर्णीक सो. यांनी सुचना दिल्या होत्या, तसेच मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री बच्छाव साो. व मा. सपोआ डॉ. सिताराम कोल्हे साो. यांनी विशेष पथकाला मार्गदर्शन केले होते.

दिनांक ०३/०१/२०२४ रोजी गुन्हेशाखा युनिट क्रमांक १ चे पोना /१८८३ विशाल काठे यांना रात्रौ ११:०० वाजता गुप्त बातमीदार यांचे मार्फतीने बातमी मिळाली की, जनार्दन स्वामी मठाकडुन तपोवनरोडकडे येणा-या रस्त्यावर बटुक हनुमान मंदिराचे समोरील बाजुस अंगात पांढरा टी शर्ट व काळी ट्रक पॅन्ट असलेला एक इसम हातात धारदार हत्यार घेवुन रस्त्याने येणा-या जाणा-या इसमांना व वाहनाना आडवुन आरडा ओरडा शिवीगाळ करून दहशत माजवत आहे. सदरची बातमी ही वपोनिरी. श्री. विजय ढमाळ सो. यांना कळविली असता त्यांनी तात्काळ सदर ठिकाणी पोहवा /१०९ प्रविण वाघमारे, पोहवा / ३६७ प्रदिप चंद्रकांत म्हसदे, पोहवा /१३१६ नाझीम पठाण, पोहवा/१८८३ विशाल काठे, पो.ना. ३७७ प्रशांत रामदास मरकड अशांचे पथक तयार करून रवाना केले. त्यानंतर सदरचे पथक हे जनार्दन स्वामी मठाजवळ गेले असता पथकाने इसमास पाहुन ओळखले की, सदरचा इसम हा आडगाव पोलीस ठाणे कडील गुरनं १३१/२०२३, भा.द.वि कलम ३०२, ३४ प्रमाणे दाखल गुन्हयात मुख्य पाहिजे आरोपी विजय पाटील आहे. त्यानंतर सदर इसमास पकडण्याचा प्रयत्न केला असता तो इकडे तिकडे पळत असतांना तो खाली पडला तेव्हा पाठलाग करणा-या गुन्हेशाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने पकडले. त्यानंतर त्याचे कब्जातुन एक धारदार तलवार ताब्यात घेतले. त्यानंतर त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव विजय राजेंद्र पाटील, वय-२४वर्षे, रा-पंचवटी अमरधाम, नाशिक असे सांगीतले.

 

आरोपी विजय राजेंद्र पाटील याने बेकायदेशीर रित्या स्वताचे कब्जात तलवार बळगल्याने त्याचे विरुध्द भा.ह.का कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा केला. तसेच आडगाव पोलीस स्टेशन गुरनं १३१/२०२३, भा.द.वि कलम ३०२, ३४ प्रमाणे दाखल गुन्हयात अटक करणेकामी आडगाव पोलीस ठाणेचे ताब्यात दिले.

 

सदरची कामगीरी मा. पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णीक साो., मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखा, मा. डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील पोलीस निरीक्षक श्री. विजय ढमाळ, पो. हवा /१०९ प्रविण वाघमारे, पो. हवा/१३१६ नाझीमखान पठाण, पोहवा / ३६७ प्रदिप म्हसदे, पो. हवा /१८८३ विशाल काठे, पो.ना/१९०० विशाल देवरे, पो.ना/३७७ प्रशांत मरकड, पोअं/२२६० जगेश्वर बोरसे अशांनी केलेली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!