सरकारवाडा व पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हयातील आरोपीस खंडणी विरोधी पथकाने घेतले तब्यात !

लाल दिवा, ता. ८ : पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे साो, नाशिक शहर यांनी पाहीजे आरोपीतांना लागलीच अटक करणेबाबत मार्गदर्शनपर सुचना दिलेल्या होत्या.

    त्या अनुषंगाने सरकारवाडा पोलीस स्टेशन कडीला गु.र.नं. ५४ / २०२३ भादविक ४२७, ३४ सह भा ह. का. कलम ४, २५ सह मु. पो. का. कलम १३५ तसेच पंचवटी पो. स्टे. येथे 1 गु.र.नं. १३८/२०२३, भा.द. वि. कलम ४५२, ४२७, ५०४, ५०६, ३४ सह भा. ह. का. कलम ४/२५ सह म.पो. का. क १३५ या दोन्ही गुन्हयातील पाहीजे आरोपी यश राजेद्र शिंदे, वय २४ वर्षे, हा गुन्हा घडल्या पासुन पसार झालेला होता.

त्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथकातील पो.ना. ९११ दत्तात्रेय चकोर व पोशि. २३९२ स्वप्नील जुंद्रे यांना गुप्त बातमीदार यांचे मार्फतीने सदर गुन्हयातील पाहिजे आरोपी हा अश्वमेघ नगर, आर. टी. ओ. ऑफिस जवळ, पेठ रोड, नाशिक येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती.

त्याप्रमाणे खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सापळा लावुन नमुद गुन्हयातील पाहिजे आरोपी यश राजेद्र शिंदे, वय २४ वर्षे, रा. श्रीराम चौक शिवदर्शन अपार्टमेंट, बी-८, जुने इंदिरानगर पोलीस स्टेशन जवळ, राजीव नगर, नाशिक यास अश्वमेघ नगर, आर. टी. ओ. ऑफिस जवळ, पेठ रोड, नाशिक येथुन शिताफीने ताब्यात घेवुन त्यास पुढील तपास व कारवाई कामी सरकारवाडा पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदर आरोपीतवर यापुर्वी १) उपनगर पो. स्टे. 1 गु.र.नं. २२०/२०१९, भा.द.वि. कलम ३०७ व इतर, २) उपनगर पो.स्टे. ॥ गु.र.नं. १४६ / २०१८, म.पो. का. कलम १३५, ३) मुंबई नाका पो. स्टे. गु.र.नं. २७/२०१६, महा. मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंधक अधि. १९९५ चे कलम ३ प्रमाणे गंभिर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगीरी अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त सो. नाशिक, मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, सो. गुन्हे, मा. श्री. वसंत मोरे, सहा. पोलीस आयुक्त साो. गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि. प्रविण सुर्यवंशी, श्रेणी पोउनि दिलीप भोई, सपोउनि दिलीप सगळे, पोहवा. किशोर रोकडे, राजेश भदाणे, पो.ना. योगेश चव्हाण, दत्तात्रेय चकोर, पो. अं. स्वप्नील जुंद्रे, भुषण सोनवणे, मंगेश जगझाप, चारूदत्त निकम व विठ्ठल चव्हाण यांनी केलेली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!