माजी नगरसेविकाच्या पतीस गुंडांकडून जबर मारहाण….. संशयित आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या….!
लाल दिवा : नाशिक रोड परिसरातील खर्जुल मळा मोरया पार्क या ठिकाणी एका अल्पवयीनाचा वाढदिवस साजरा करण्याच्या कारणातून काही गुंडांनी माजी नगरसेविका जयश्री खर्जुल यांचे पती नितीन खर्जुल यांसह तीन जणांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी नाशिक रोड परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती कळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांसह पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले. जखमींना उपचारार्थ नाशिक रोड मधील जयराम हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले. असून अवघ्या काही मिनिटातच जीवघेणा हल्ला करणाऱ्या संशयित आरोपींना नाशिक रोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जखमी नितीन खर्जुल हे माजी नगरसेविका जयश्री खर्जुल यांचे पती असून बांधकाम व्यवसायिक किरण खर्जुल हे देखील या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहे. या घटनेची माहिती कळताच जयराम हॉस्पिटल बाहेर एकच गर्दी जमली होती, घडल्या प्रकाराबाबत माहिती घेतली असता वाढदिवस साजरा करत असताना परिसरात उच्छाद मांडत असल्याने नितीन खर्जुल व त्यांच्या सहकाऱ्यांनी संबंधितांना समजावण्याचा प्रयत्न केला असता रवींद्र गाढवे व त्याचा भाऊ संदीप गाढवे यासह काही पाच ते सहा अज्ञात संशयतांनी धारदार शस्त्राने संबंधितांवर हल्ला चढवला यामध्ये खर्जुल हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नाशिक रोड येथील जयराम हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना विचारपूस केली असता दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. हल्ला करणाऱ्या संशयीतांना नाशिक रोड पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू