सिडको परिसरात पाचशेच्या डुप्लिकेट नोटांचा पाऊस…… अंबड वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी संशयित आरोपीस ठोकल्या बेड्या…… पोलिसांच्या कामगिरी बाबत नागरिकांनी केले कौतुक……!
लाल दिवा : अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाचशे रुपयांच्या बनावट नोटा बाळगणाऱ्या एकास पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अशोक अण्णा पगार (रा सिन्नर) असे संशयिताचे नाव आहे. सिडकोतील माऊली लॉन्स येथे संशयित बनावट नोटा बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार पोलीस आणि सापळा रचून संशयितास अटक केली आहे. त्याच्याकडे पाचशे रुपये किंमत तिच्या बनावट तीस नोटा मिळून आल्या, अजूनही बनावट नोटा त्याच्याकडे असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. बनावट नोटा कुठून व कशाप्रकारे आणल्या किंवा बनावट नोटा प्रिंटर द्वारे छापल्या की काय असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
1
+1