गहिवरलेल्या वृद्ध दांपत्याने पोलीस आयुक्तांची भेट घेत…… दिली बगीच्यातील गोड पपईची भेट…. हे दृष्य बघून उपस्थितांच्याही डोळ्यातून अश्रू अनावर…..!
लाल दिवा : पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी जनतेच्या पाठीशी उभे राहण्याचे जणू काही मिशनच सुरू केले आहे. त्यामुळे ते एकप्रकारे नाशिककरांच्या गळ्यातील ताईत बनून पाहत आहेत. एवढेच नव्हे तर पोलीस कर्मचाऱ्यांसाठी देखील ते विविध उपक्रम राबवून पोलिसांवरील ताण कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. जनता असो वा पोलीस ते सर्वांसाठी एक पाऊल पुढे टाकत आहेत. तर दुसरीकडे ते गुन्हेगारांचा कर्दनकाळ देखील बनवू पाहत आहेत. पोलिस आयुक्तांच्या या भूमिकेमुळे सर्वचजण आनंदीत असल्याचे वातावरण नाशिक शहरांमध्ये तरी सध्या बघायला मिळत आहे. त्यांनी केलेल्या अशाच एका स्तुत्य उपक्रमाबाबत सध्या नाशिक शहरात चर्चा एकाला मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी एका बांधकाम व्यावसायिकाने आपल्या लालसे पोटी कॉलेज रोडवरील एका वृद्ध दांपत्याचा बंगला हडपण्याचे काटकारस्थान केले. या बंगल्यात दरोड्याचा प्रयत्न दाखवून सदर दांपत्यास महाराहान केली. सुदैवाने त्यात त्यांचा जीव वाचला. घाबरलेले वृद्ध दांपत्य तो बंगला सोडून देतील व त्या जागी आपण एक मोठी बिल्डिंग उभारू आणि कोट्यावधी रुपयांची माया जमवू असा काहीसा कट त्या बांधकाम व्यवसायीकाने रचला होता. परंतु पोलिसांनी त्यांचा तो कट उधळून लावला. त्याच्या मुसक्या आवळल्या. सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस आयुक्तांनी पोलिसांना या घटनेत लक्ष घालण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी देखील त्याचा योग्य तो छडा लावला. आपल्यावरील होणारे अन्यायाला पोलिसांनी वाचा फोडली. याचे ऋण व्यक्त करण्यासाठी वृद्ध दांपत्याने दस्तुरखुद्द पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. गहिवरलेल्या वृद्ध दांपत्याने पोलीस आयुक्तांना सांगितले की, आमची मुलं परदेशात आहेत. आमच्याकडे देण्यासारखे काहीच नाही. आमच्या जुन्या आठवणी त्या बंगल्यामध्ये आहेत. या ठिकाणी आम्ही काही झाडी लावली आहेत. त्या झाडांपैकी एक पपईचे झाड आहे. त्याला गोड पपया आल्या आहेत. त्यापैकी एक पपई आपण भेट स्वरूपात स्वीकारावी. अशी त्यांनी विनवणी केली. आणि तेवढ्याच उदात्त मनाने पोलीस आयुक्तांनी पपईची भेट स्वीकारली. नाशिक शहरातील कोणत्याही वृद्ध दांपत्याला अशा प्रकारच्या अडचणी आल्यास आम्ही त्याच्या सदव्य पाठीशी उभे राहू असे आश्वासन यावेळी पोलीस आयुक्तांनी दिले. यावेळी त्यांच्यासोबत उपायुक्त प्रशासन चंद्रकांत खांडवी सहाय्यक पोलीस उपायुक्त सिताराम कोल्हे जनसंपर्क अधिकारी विजय लोंढे पीएसआय सचिन वाकडे हेही उपस्थित होते. पोलीस आयुक्तांच्या या भेटीची नाशिक शहरामध्ये सर्वत्र चर्चा ऐकायला मिळत आहे…..