उपनगर पोलिसांची जबरदस्त कामगिरी…..खुनाच्या गुन्हयातील आरोपीतांना २४ तासाच्या आत अटक….!
लाल दिवा-नाशिक,९ :- (दि,७) मे रोजी रात्री ११ वा. सुमारास उपनगर पोलीस ठाणे हद्दित शिवाजी महाराज पुतळ्याजवळील चौकाचे स्पिडब्रेकर जवळ, रोकडोबावाडी, देवळालीगाव, नाशिक रोड याठिकाणी इसम नामे अरमान मुन्नवर शेख, वय १९ वर्षे, रा. 1 नंबर गल्ली, सुंदरनगर देवळाली गाव, नाशिकरोड, नाशिक या इसमास तो मित्रासोबत मोपेडवरून जात असतांना पुर्व वैमनस्याच्या रागातून ७ इसमांनी आरोपीतानी त्याचेकडील चॉपर तसेच धारधार शस्त्रांनी मयत याचे शरीरावर वार करून त्यास संगणमताने जिवे ठार मारले. सदर बाबत फिर्यादी यांनी तकार दिल्यावरून गुन्हा रजि क 176/2024 भादवि कलम 302,चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर बाबत माहिती प्राप्त होताच मा. पोलीस आयुक्त संदिप कर्निक यांच्या मार्गदर्शननानुसार पोलीस उप
आयुक्त परिमंडळ-2. मोनिका राउत, पोलीस आयुक्त, नाशिकरोड विभाग सचिन बारी यांनी घटनास्थळी भेट देवून उपनगर पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथक व नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे वेगवेगळे पथक तयार करून आरोपींचा शोध घेणे बाबत सुचना दिल्या. पोलीस उपआयुक्त परिमंडळ २ मोनिका राउत, सपोआ सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक गुन्हे रनजित नलवडे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस ठाण्याचे उपनगर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथक सपोनि चौधरी व पथक तसेच नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हे शोध पथक सपोनि प्रविण सुर्यवंशी व पथक असे दोन तपास पथके तयार करून आरोपींताचे शोध घेणे कामी रवाना केले.
उपनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने पोहवा विनोद लखन यांना मिळालेल्या गुप्तबातमीच्या आधारे सपोनि चौधरी,
पोहवा विनोद लखन, पोशि पंकज कर्पे, पोशि सौरम लोंढे यांनी गुन्हयातील आरोपी
1) आकाश गणेश दिनकर उर्फ चंप्या वय 21 वर्षे, रा. रोकडोबावाडी, देवळाली गाव, नाशिकरोड, नाशिक
2) रवि जयसिंग राठोड उर्फ राहुल वय 19 वर्ष, रा. रोकडोबावाडी, देवळाली गाव, नाशिकरोड, नाशिक
3) संदेश राजु मांगकाली उर्फ झिंग्या वय 19 वर्ष, रा रोकडोबावाडी, देवळाली गाव, नाशिकरोड, नाशिक यांना धोबी मळा,
रोकडोबावाडी, नाशिकरोड परिसरातून ताब्यात घेतले.
तसेच उपनगर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे सपोनि सचिन चौधरी यांना आरोपी लहवींत शिवारात लपुन बसल्याची गुप्त बातमीदारामार्फतीने बातमी मिळाल्याने सपोनि चौधरी, पोहवा विनोद लखन, पोहवा इमरान शेख, पोशि जयंत शिंदे, पोशि गौरव गवळी असे मा. वरिष्ठ यांचे आदेशाने खाना होवुन आरोपीताचा शोध घेतला आरोपी पोलीसांची चाहुल लागल्याने तेथुन ते पळुन जाण्याच्या प्रयत्न करत असतांना सापळा रचुन कौशल्याने ताब्यात घेतले. त्याचे नावे खालील प्रमाणे :-
1) आकाश काशयप तपासे वय 19 वर्ष, मालधक्का रोड, नाशिकरोड, नाशिक
2) प्रेम संतोष डेंगळे उर्फ टक्या वय 19 वर्षे, रा. गुलाबवाडी, मालधक्का, नाशिकरोड, नाशिक
3) सुमित बाळु जाधव उर्फ चिक्या, वय 23 वर्ष, रा. फ्लॅट नं 6, विहितगाव, अर्पणसोसा, नाशिकरोड, नाशिक
4) सम्यक संदिप उन्हवणे उर्फ सम्या वय 18 वर्षे, रा. फ्लॅट नं 28, साईलिला, विहीतगाव बस स्टॉपचे मधील बिल्डींग, नाशिकरोड, नाशिक
सदर कामगिरी पोलीस उप आयुक्त परिमंडळ-2. मोनिका राउत सहा. पोलीस आयुक्त, नाशिकरोड विभाग सचिन बारी साो यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि. जितेंद सपकाळे, पोनि रनजित नलवडे, सपोनि सचिन चौधरी, पोउपनि मंगेश गोळे, पोउपनि शशिकांत पवार, पोउपनि विशाल सपकाळे, पोउनि सुरेश गवळी, पोहवा विनोद लखन, इम्मन शेख, पोना गोविंद भामरे, पोशि सौरभ लोंढे, पंकज कर्पे, जयंत शिंदे, गौरव गवळी, संदेश रगतवान, मिलींद बागुल, मुकेश क्षिरसागर, सुनिल गायकवाड, अशांनी केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोनि श्री. रनजित नलवडे करत आहेत.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1