नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाणले ……घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार हसन कुट्टी जाळयात….. घरफोडया करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद…… घरफोडीचे १० गुन्हे उघडकीस…..!

लाल दिवा-नाशिक,ता.२८:- घरफोड्या करणाऱ्या अट्टल टोळीला नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली आहे. या टोळीच्या म्होरक्याला पोलिसांनी नाशिकच्या पंचवटीतील नवनाथ नगरमधून अटक केली आहे. त्याच्या अटकेने १० घरफोड्यांना अटक करून १० घरफोड्यांचीही उकल झाली आहे. यातील संशयित हे अट्टल गुन्हेगार आहेत. हसन हमजा कुट्टी (४५, रा. शेवाळे चाळ, नवनाथनगर, पेठरोड, नाशिक. मूळ रा. केरळ), दिलीप रुमालसिंग जाधव (२३, रा. फुलेनगर, पंचवटी), अनिल छत्तरसिंग डावर (२६, रा. फुलेनगर), मुस्तफा अब्दुल अन्सारी (२५, रा. चाळीसगाव फाटा, मालेगाव), सैयद इस्माईल सैयद जहूर (४२, रा मालेगाव), मोहम्मद अस्मल अब्दुल सत्तार (३८, रा. मालेगाव), सईद शेख उर्फ सईद बुड्या (३४, रा. मालेगाव), सय्यद निजाम सय्यद अन्वर (४०, रा. आयशानगर, मालेगाव), हनिफ खान इक्बाल खान (३२, रा. मालेगाव), शेख तौफिक शेख सुलेमान उर्फ पापा फिटींग (२६, रा. मालेगाव) अशी अटक करण्यात आलेल्या अट्टल घरफोड्या टोळीतील संशयितांची नावे आहेत. इगतपुरी हद्दीतील तळेगाव शिवारात गेल्या २४ तारखेला हॉटेल साई प्लाजामध्ये घरफोडी करीत संशयितांनी सुमारे अडीच लाखांची घरफोडी केली होती. याप्रकरणी समांतर तपास स्थानिक गुन्हेशाखा करीत होती. त्यावेळी नाशिक शहर व मालेगावातील घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयित जामिनावर सुटले असून, त्यांची ही घरफोडी केल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार, स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने संशयित हसन कुट्टी यास पेठरोडवरील नवनाथनगरमधून शिताफीने अटक केली. त्याच्या चौकशीतून गुन्ह्याची उकल झाली आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली.

सदरची कामगिरी विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे, अधीक्षक विक्रम देशमाने, अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर, अपर अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, सहायक निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक संदीप पाटील, शिवाजी ठोंबरे, चेतन संवत्सरकर, प्रवीण सानप, किशोर खराटे, हेमंत गिलबिले, शरद मोगल आदींच्या पथकाने केली.

 

या घरफोडींची झाली उकल घोटीतील २, इगतपुरीतील २, चाळीसगाव शहरातील २, राहुरीतील (नगर) २ आणि दिंडोरीतील १

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!