थायलंडहून आणलेला गांजा जप्त; दोघे जेरबंद, २ लाखांहून अधिकचा मुदेमाल हस्तगत…

नाशिकमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई यशस्वी; २.२४ लाखांचा गांजा जप्त, २ जेरबंद

नाशिक (प्रतिनिधी) – शहरातील अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत थायलंडहून बेकायदेशीररित्या आणलेला गांजा विक्री करणाऱ्या टोळीतील दोन जणांना अटक करण्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाला यश आले आहे.

दिनांक ७ ऑक्टोबर रोजी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, विशाल वसंत बावा/गोसावी (२५, रा. नवजीवन शाळेसमोर, सप्तश्रृंगी माता मंदिराजवळ, शिवशक्ती चौक, नाशिक) आणि लविन महेश चावला (२६, रा. सतनम बंगलो, इनायत कॅफे हॉटेलचे मागे, इंदिरानगर, नाशिक) हे दोघे परदेशातून आणलेला गांजा विक्री करत आहेत. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून दोघांनाही रंगेहाथ पकडले.

त्यांच्याकडून २ लाख २४ हजार रुपये किमतीचा ६८६ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यातील कलम ८ (क), २०(अ), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, अटक करण्यात आलेला विशाल बावा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे उघड झाले आहे. त्याच्यावर अंबड पोलीस ठाण्यात २०१३ मध्ये भादंवि कलम ३२४, ३२३ आणि मपोका १३५ अन्वये तर २०१९ मध्ये सातपूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३९२, ४११ आणि ३४ अन्वये गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे, सहायक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, विशाल पाटील, रंजन बेंडाळे, देवकिसन गायकर, संजय ताजणे तसेच पोलीस अंमलदार भारत डंबाळे, बळवंत कोल्हे, बाळासाहेब नांद्रे, योगेश सानप, चंद्रकांत बागडे, अविनाश फुलपगारे आणि अर्चना भड यांच्या पथकाने पार पाडली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!