तौसिफ अहमद बुरानुद्दीन शेख लाचेच्या प्रकरणात दोषी आढळला ….!
लाल दिवा -नाशिक येथील उपनगर पोलीस स्टेशन येथे दाखल झालेल्या लाचखोरीच्या एका प्रकरणात, आरोपी तौसिफ अहमद बुरानुद्दीन शेख (वय २५, धंदा तलाठी मदतनीस) याला मा. जिल्हा न्यायाधीश – ३ श्री बी.व्ही. वाघ साहेब नाशिक यांनी दिनांक २९/०८/२०२४ रोजी दोषी ठरवले आहे.
आरोपीने तक्रारदार श्री आहूजा (वय ५२, धंदा मसाला विक्री, राहणार उल्हासनगर) यांच्या पत्नीच्या मृत्युपत्रावरून वारस नोंद करून देण्यासाठी २०,०००/- रुपयांची लाच मागितली होती. दिनांक ६/६/२०२३ रोजी तक्रारदार श्री अहूजा यांच्याकडून आरोपीने पंचांसमक्ष २०,०००/- रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आला.
याप्रकरणी उपनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक ३०२५/२०१३ भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ कलम ८ अन्वये दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक श्री शरद माधवराव पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास केला आणि तत्कालीन पोलीस निरीक्षक श्री स्वप्निल राजपूत यांनी मा. न्यायालयात खटला दाखल केला.
सरकारी वकील श्री अनिल पी. बागले यांनी हे प्रकरण न्यायालयात चालवले. पोलीस तपास आणि साक्षीदारांच्या पुराव्यांवरून मा. न्यायालयाने आरोपी तौसिफ अहमद बुरानुद्दीन शेख याला भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम ८ अन्वये दोषी ठरवून २ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि २०००/- रुपये दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास आरोपीला २ महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल.
हे खटले कोर्ट अंमलदार पोहवा/५०२ प्रदीप काळोगे आणि मपोना /६२७ ज्योती पाटील यांनी पाहिले.