स्विगी डिलिव्हरी बॉयकडून विनयभंग : पंचवटी येथील विनयभंगच्या गुन्हयातील अज्ञात आरोपीतास वर्णनावरून २४ तासाच्या आत केले जेरबंद….. नागरिकांनी मानले आभार…!
- • युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक….. मधुकर कड यांची जबरदस्त कामगिरी…..
लाल दिवा-नाशिक,ता.२५:-…....पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत ( दि.२३) ऑगस्ट २४ फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बालकांचे लैगिंक अपराध संरक्षण अधिनियम कलम ८, १२ प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयाचे अनुषंगाने प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, व संदिप मिटके, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक शहर यांनी गुन्हयातील अज्ञात आरोपीताचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत गुन्हेशाखेचे पोलीस पथक यांना सुचना देवुन मार्गदर्शन केले होते.
गुन्हेशाखा युनिट क १ चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळास तात्काळ भेट देवुन तेथील सी.सी.टी.व्ही फुटेजची पाहणी करून फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्याद मधील अज्ञात आरोपीताच्या वर्णनावरून शोध घेतला तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे सदर गुन्हा हा स्विगी डिलीव्हरी बॉय फारूख पठाण, रा-श्रमिक हौसिंग सोसायटी, नाशिक याने केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मा. वपोनि मधुकर कड यांनी सपोनि हेमंत तोडकर, पोउनि गजानन इंगळे, पोहवा प्रदिप म्हसदे, विशाल काठे, आप्पा पानवळ, नितीन जगताप, विलास चारोस्कर, राम बर्डे, जगेश्वर बोरसे, समाधान पवार अशांचे पथक तयार करून आरोपीतांचा शोध घेण्याकामी नाशिक शहर परिसरात खाना केले.
नमुद पथकाने इंदिरानगर परिसरात सदर आरोपीतांचा भर पावसात तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी याचा शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव फारूख मोहंमद पठाण, वय-३९वर्षे, रा-श्रमिक हौसिंग सोसायटी, राजीवनगर नाशिक असे सांगीतले. त्यास वरील गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. तरी आरोपीतास पुढील तपासकामी पंचवटी पोलीस ठाणे यांचे ताब्यात दिले आहे.