गस्त नाटकातून प्रशांत हिरे यांना रविवारी आदरांजली
लाल दिवा, ता. ६ : दिवंगत कलावंत प्रशांत हिरे यांनी अडीज वर्षांपूर्वी गस्त हे नाटक करण्याचे योजले होते. त्यांनी संहितावाचन व काही सीन बसवले होते. मात्र, कोरोनामुळे नाट्यगृहे बंद झाली, नाटकाचे प्रयोग थांबले आणि गस्त नाटक अधांतरीच राहिले. ७ मे रोजी प्रशांत हिरे यांचा व्दितीय स्मृतीदिन आहे. त्यानिमित्त त्यांनी दिग्दर्शित केलेल्या गस्त नाटकातून त्यांच्या स्मृती उजाळा देत आदरांजली वाहिली आहे. रविवारी (दि. ७) सायंकाळी ६.३० वाजता परशुराम सायखेडकर नाट्यगृह येथे गस्त नाटक सादर केले जाणार आहे.
प्रशांत हिरे यांनी दिग्दर्शित केलेले गस्त हे शेवटचे नाटक आहे. या नाटकाचे सूत्रधार मुकेश काळे हे काम पाहत आहेत. हिरे यांच्या शिकवणीत घडलेल्या सहृदय कलावंत स्वाती शेळके, मनोज खैरनार, मनीषा अक्कर
शिरसाट, राम वाणी यांनी गस्त नाटक सादर करणार आहेत. या नाटकात मनोज खैरनार, स्वाती शेळके, मनीषा अक्कर शिरसाट, संदीप पाचंगे, दिलीप काळे, ऋषिकेश रोटे, रविराज वरखेडे, तन्मय भोळे, ज्ञानेश्वर भोसले, प्रतिक पाटील, अवतार कावले, वैभव तांबे, राजेंद्र चिंतावार, रचना चिंतावार, पूजा घोडके, मनोज शिंद्रे, छाया लोहकरे, राम वाणी,
काव्या पाचंगे आदी कलाकार आहेत. नाटकाची प्रकाशयोजना रवी रहाणे, संगीत वैभव काळे, आदित्य नैरे, रोहित सरोदे, रंगभूषा माणिक कानडे, रंगमंच सहाय्यक शुभम बागुल आदी काम पाहत आहेत. हा नाट्यप्रयोग प्रेक्षकांसाठी विनामूल्य असून, यावेळी प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कलाकृतीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन कलावंतांनी केले आहे