उपनगर पोलीस स्टेशन हद्दीतील खुनाच्या गुन्हयातील अनोळखी आरोपी निष्पन्न करून जेरबंद …… गुन्हेशाखा युनिट क्र. ०१ नाशिक शहर ची कामगिरी…!
लाल दिवा -नाशिक : दि. २९-०५-२०२३ रोजी फिर्यादी नामे मधुकर नानाजी दिवेकर यांनी तक्रार दिली की, त्यांचा मुलगा प्रविण मधुकर दिवेकर वय ४७ यास दि. २८-०५-२०२३ रोजी २१:०० वा. ते दि. २९-०५-२०२३ रोजी ११:०० वा. चे दरम्यान रामेश्वरनगर, हेतल सोसायटी, विंग ए येथील फ्लॅट नं. १२, नाशिकरोड, नाशिक येथे त्याचा राहते घरात कोणीतरी अज्ञात इसमांनी अज्ञात कारणासाठी धारधार हत्याराने गळा कापुन व छातीवर, पोटावर भोकसुन त्याला गंभीर जखमी करून जिवे ठार मारले त्यावरून उपनगर पोलीस ठाणे। गुरनं २१९ / २०२३ भादवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
मा. पोलीस आयुक्त सो. नाशिक शहर व मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) नाशिक शहर यांनी सदर गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेवुन त्यांचेवर कारवाई बाबतच्या सुचना दिलेल्या होत्या.
सदर गुन्हयास मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) नाशिक शहर यांनी घटनास्थळी भेट देवुन युनिट ०१ व ०२ यांचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकास योग्य ते मार्गदर्शन व सुचना करून अनोळखी आरोपी निष्पन्न करून त्यांस ताब्यात घेवुन गुन्हा उघडकीस आणणे बाबत आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने गुन्हेशाखा युनिट क्र. ०१ चे सपोनि / हेमंत तोडकर व पथक तसेच युनिट क्र. ०२ चे पोउनि / पोपट कारवाल व पथक हे अज्ञात आरोपीताचा शोध होते.
सदर गुन्हया मध्ये कोणताही पुरावा नसतांना गुन्हेशाखा युनिट ०१ चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हे तपासाचे मानवी कौशल्य वापरून तसेच गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीच्या आधारे सदर गुन्हा हा तुषार पवार याने केल्याचे निष्पन्न झाल्याने सदर आरोपीताचा शोध घेत असतांना पोलीस नाईक विशाल काठे व आप्पा पानवळ अशांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, तुषार पवार हा आडगाव चौफुली येथे येणार आहे अशी माहीती मिळाल्यावरून सदरची माहीती मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. आंचल मुदगल यांना देवुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली साफळा रचुन आडगाव चौफुली येथे तुषार पवार आला असता त्यास जागीच पकडले. त्यास त्याचे पुर्ण नाव विचारता त्याने त्याचे नाव तुषार सिध्दार्थ पवार वय- २८ रा. इंद्रप्लाझा सोसा. रूम नं. ३०२, नाशिक रोड, नाशिक असे सांगीतले व त्यास ताब्यात घेवुन गुन्हयाचे अनुषंगाने नमुद आरोपीताकडे विचारपुस केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली आहे. व सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार नामे चेतन दिगंबर देहाडे असा असल्याचे सांगुन सदर साथीदार हा विधी संघर्षीत बालक असल्याने त्याचे पालक दिगंबर देहाडे यांना उपनगर पो.स्टे. येथे हजर राहणे बाबत समज दिली आहे. सदर आरोपीतांना पुढील कारवाई कामी उपनगर पोलीस ठाणे येथे हजर केले आहे. असुन पुढील तपास उपनगर पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे सो, मा. पोलीस उप आयुक्त प्रशांत बच्छाव सो, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. वसंत मोरे साो, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्र. १ नाशिक शहर कडील वपोनि. श्री. डॉ. आंचल मुदगल, सपोनि / हेमंत तोडकर, पोउनि / चेतन श्रीवंत, पो.हवा. / प्रविण वाघमारे पो. ना. / विशाल काठे, आप्पा पनवळ, नाझीम पठाण, मुक्तार शेख, सपोउनि / किरण शिरसाठ यांनी केलेली आहे.