महिलेवर हल्ला करणारा आरोपी परभणी येथून गुन्हे शाखा युनिट दोन कडून ताब्यात…. पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी, पोलीस हवालदार गुलाब सोनार व शंकर काळे यांची जबरदस्त कामगिरी….!
लाल दिवा-नाशिक,ता.२१ : नाशिकरोड पोv. ठाणे कडील गु.र. नंबर 540 /2023 भा.द.वि. -307,354,452,323,506 या गुन्ह्यातील संशयीत आरोपी हा गुन्हा केले नंतर ना. रोड येथून परभणी येथे पळून गेला तो मिळून येत नव्हता .त्यास अटक करणे असल्याने त्याचा शोध घेण्याबाबत मा.पोलीस आयुक्त संदीप कर्णिक
व पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सो . गुन्हे शाखा यांनी आदेश दिल्याने सदर गुन्ह्यातील आरोपीताचा गुन्हे शाखा युनिट -2चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत नलवडे सो.यांचे मार्गदर्शनाखाली शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट दोन कडील पो. हवा. शंकर काळे यांना गोपनीय माहिती द्वारे माहिती मिळाली कि वरील गुन्ह्यातील आरोपी नामे- दिपक राजू डोंगरे वय 21 वर्ष रा- श्रमिक नगर, जेल रोड, नाशिक रोड,नाशिक,हा देवगाव ता. पाथरी, जि. परभणी येथे असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक. संदेश पाडवी, पो. हवा. शंकर काळे ,गुलाब सोनार अशांनी देवेगाव,ता. पाथरी जि. परभणी येथे जाऊन शोध घेऊन त्यास ताब्यात घेऊन पुढील कारवाईकामी नाशिक रोड पोलीस ठाणेस हजर केले आहे .