उपनगर हद्दीतील ! सराईत गुन्हेगार.जय उर्फ मा-या उर्फ मारुती याचेवर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कारवाई…..!

लाल दिवा : उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील इसम नामे जय उर्फ मा-या उर्फ मारुती वाल्मीक घोरपडे वय 21 वर्षे रा. विठठल मंदिराच्या मागे, विहितगाव, नाशिकरोड याने त्याची राहत असलेल्या लगतच्या परिसरात दहशत कायम राहावी यासाठी त्याने दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. त्याच्या गुन्हेगारीला प्रतिबंध होणेसाठी त्याचेवर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती.
 
जय उर्फ मा-या उर्फ मारुती वाल्मीक घोरपडे याचेवर प्रतिबंधात्मक कारवाई करुन देखील पुन्हा गुन्हेगारी कृत्य चालु ठेवल्याने मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी त्यास मध्यवर्ती कारागृह, नाशिकरोड येथे एम.पी.डी.ए कायदा सन 1981 चे कलम 3(2) अन्वये स्थानबध्द करणे बाबतचे आदेश दिनांक 02/04/2024 रोजी जारी करुन त्यास मध्यवर्ती कारागृह नाशिकरोड येथे स्थानबध्द करण्यात आले आहे.
 
इसम नामे जय उर्फ मा-या उर्फ मारुती वाल्मीक घोरपडे याचे विरूध्द नाशिकरोड व उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत जसे सर्वसामान्य नागरिकांना धारदार शस्त्रांचा धाक दाखवुन, जबर दुखापत, जबरी चोरी, घरफोडी, खुनाचा प्रयत्न, लुटमार, महिलांची छेडछाड, अपहरण, गैरकायदयाची मंडळी जमवुन मनाई आदेशाचे उल्लंघन करणे असे एकुण 11 प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
 
मा.श्री. संदिप कणिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी नाशिक शहरातील सार्वजनिक सुव्यवस्था आबाधीत राहावी त्यासाठी सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करणारे गुन्हेगार यांचेवर एम.पी.डी.ए. कायदयान्वये स्थानबध्दतेची प्रतिबंधक कारवाई केल्यामुळे नाशिक शहरातील नागरिकांनी सदर कारवाई बाबत समाधान व्यक्त केले आहे.
 
नाशिक शहरातील सार्वजनिक शांततेस बाधा करणाऱ्या व समाज स्वास्थ्य बिघडविणाऱ्या गुन्हेगार इसमांची माहिती संकलीत करण्यात येत असुन यापुढे जास्तीत जास्त गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए. कायदयाच्या तरतुदीनुसार प्रभावीपणे प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!