धारदार शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक ; गुन्हेशाखा युनिट क. १ चे पोलीस हवालदार देविदास ठाकरे यांची धडाकेबाज कामगिरी…..

लाल दिवा-नाशिक,ता.१५ :- लोकसभा - २०२४, आदर्श आचारसंहीता च्या दृष्टीने नाशिक शहरात प्राणघातक
 
शस्त्रे बाळगणारे व दहशत माजविणारे इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर कठोर कारवाई करणे बाबत पोलीस आयुक्त नाशिक शहर  संदीप कर्णीक यांनी सुचना दिल्या होत्या, त्या अनुषगांने पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहा. पोलीस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे यांनी गुन्हे शाखेचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन केले होते.

 

 
त्याअनुषंगाने नाशिक शहरात प्रतिबंधात्मक गस्त करीत असतांना आज (दि.१५) २४ रोजी गुन्हेशाखा युनिट ०१ कडील पोलीस हवालदार  देविदास ठाकरे यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, भाजी मार्केट, म्हसरूळ, दिंडोरी रोडवर दोन इसम २० ते २५ वयोगटातील असे दोघे जण कमरेला धारदार कोयते लावुन घेवुन मोटार सायकल वर फिरत असल्याची बातमी मिळाली, सदरची बातमी गुन्हे शाखा युनिट १ चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक  मधुकर कड यांना देवुन त्यांनी यांचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन करून रवाना केले नमुद पथकाने भाजी मार्केट, म्हसरूळ, दिंडोरी रोडवर नाशिक येथे सापळा लावुन मिळालेल्या बातमी प्रमाणे ०२ इसम नामे १) धनराज गोकुळ लांडे रा. मखमलाबाद लिंक रोड, म्हसरूळ, नाशिक २) हर्षल राजु मोंढे रा. दिंडोरी रोड, म्हसरूळ, नाशिक यांना त्यांचे ताब्यातील यामाहा आर वन फाईव्ह मोटार सायकल जीचा क्रमांक एम एच १५ जे के ६५९८ हीचे सह ०३ लोखंडी कोयते व ०१ चाकु असा ८३,५००/- रूपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. सदर इसमां विरूध्द म्हसरूळ पोलीस ठाणे येथे सरकार तर्फे फिर्याद देवुन गुन्हा दाखल केला असुन ०२ आरोपी इसम व जप्त मुददेमाल पुढील कारवाई कामी म्हसरूळ पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
 
सदरची कामगीरी पोलीस आयुक्त  संदिप कर्णिक व  पोलीस उप-आयुक्त  प्रशांत बच्छाव,  सहा. पोलीस आयुक्त  सिताराम कोल्हे, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शमधुकर कड, सपोनि हेमंत तोडकर, पोउनि गजानन इंगळे, सपोउनि वसंत पाडव, सुरेश माळोदे, पो. हवा देविदास ठाकरे, योगीराज गायकवाड, रमेश कोळी, शरद सोनवणे, संदिप भांड, प्रदिप म्हसदे, धनंजय शिन्दे, राजेश लोखंडे, पो.अं.विलास चारोस्कर, अमोल कोष्टी, आप्पा पानवळ, राजेश राठोड, महेश साळुंके, राहुल पालखेडे, भोलासिंग परदेशी, चालक सपोउनि  किरण शिरसाठ, समाधान पवार, पोहवा नाझीम पठाण, यांनी संयुक्त रित्या केलेली आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!