जातीय तेढ निर्माण करणा-या…….. सोशल मिडीया प्लॅटफार्मवरील प्रोफाइलधारकांवर सक्त कारवाई……..गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल……!

लाल दिवा : नाशिक शहरामध्ये विविध सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर दोन धर्म व जातींमध्ये तेढ निर्माण होवून, त्यांच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने दोन धर्म व जातीमध्ये शत्रुत्व निर्माण होवून सामाजिक एकोप्यास बाधा येईल अशा प्रकारचे दोन भिन्न धर्माच्या प्रार्थनास्थळासमोर हिरवा व भगवा गुलाल उधळल्याचे मॉर्फ व खोटे व्हिडीओ, रिल्स व स्टेट्स ला भडकावू कॅप्शन टाकून, ऑनलाईन पोस्ट व्हायरल केल्याने, नमुद इसमांविरूध्द दिनांक १०/०६/२०२४ रोजी सायबर पोलीस ठाणे येथे गुरक ४३/२०२४ कलम १५३ (अ), २९५ (अ) भादवि. प्रमाणे सरकार पक्षातर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

दोन धर्म व जातींमध्ये तेढ निर्माण करणारे, व्हिडीओ, रिल्स व स्टेट्स ला भडकावू कॅप्शन टाकून, ऑनलाईन पोस्ट व व्हिडीओ कोणतीही शहानिशा न करता विविध सोशल मिडीया प्लॅटफॉर्म वर प्रसारीत केल्या जात आहेत. या प्रकारचे व्हिडीओ, फोटो अथवा भडकावू मजकुर प्रसारीत करणा-या इसमांचा शोध घेवुन गुन्हे शाखा युनिट क्रमांक ०१, नाशिक शहर यांचेकडून योग्य ती कडक कायदेशिर कारवाई केली जात आहे.

याद्वारे नागरीकांना गुन्हे शाखा, नाशिक शहर यांचेकडून आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारचे भडकावू पोस्ट, आपल्या निदर्शनास आल्यास, तो डिलीट करावा, पुढे शेअर करु नये तसेच त्यांची माहिती सायबर पोलीस ठाणे येथे कळवावी. प्रसारीत केला जाणारा एखादा भडकावू मजकुर, व्हिडीओ, फोटो यामुळे दोन गटांमध्ये तेढ निर्माण होणार नाही अथवा सामाजिक बांधिलकी/शांतता बिघडून एखादा दखलपात्र अपराध होणार नाही याबाबत सर्वोतोपरी काळजी घ्यावी.

What’s your Reaction?
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!