अवघ्या अडीच हजार रुपयासाठी….. विशेष शाखेचे सहाय्यक पोलीस फौजदार…….शंकर गोसावी लाच घेताना रंगेहाथ अटक ……!
लाल दिवा-नाशिक,ता.७ :- शंकर जनार्दन गोसावी, सहा. पोलीस फौजदार, नेमणूक- विशेष शाखा, नाशिक शहर पोलीस दल. रा. फ्लॅट नंबर 108, ठक्कर हार्मनी, ए विंग, शहनाई लॉन्स जवळ टाकळी रोड, तपोवन, नाशिक लाचेची मागणी ( दि,६ )मार्च २०२४ रोजी २५०० लाच स्विकारली लाचेचे कारण यातील तक्रारदार हे नाशिक शहर पोलीस आयुक्तालायचे हद्दीत एक कॅफे restaurant चालवितात. सदरील कॅफे restaurant हे कॉलेज परिसरात असल्याकारणाने तेथे विद्यार्थी – विद्यार्थीनीं यांची वर्दळ असते. त्यामुळे विद्यार्थि यांना privacy असावी म्हणून तक्रारदार यांनी रेस्टॉरंट मधील टेबलांना आडोसा केला होता. सदर बाबत माहिती यातील आरोपी लोकसेवक यास झाल्याने त्याने सुमारे सहा महिने पूर्वी तक्रारदार यांच्याकडे येऊन त्यांना तु कुंटणखाना चालवितोस तुझ्यावर कारवाई करेन असा दम देऊन तक्रारदार यांच्या कॅफे वर कारवाई न करण्याचे मोबदल्यात त्यांच्याकडून दरमहा २०००/- ते ३०००/- रुपये लाच म्हणून घेत असे.
तक्रारदार हे फक्त रेस्टॉरंट व्यवसाय करत असून कोणताही गैरव्यवसाय करत नाहीत. म्हणून त्यांना आरोपी लोकसेवक यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभाग येथे तक्रार केली. सदरील तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी केली असता आरोपी लोकसेवक हे विशेष शाखा, नाशिक शहर पोलीस येथे नेमणूकीस असताना तक्रारदार चालवीत असलेल्या restuarant व्यवसायशी त्यांचा काहीएक संबंध नसताना तक्रारदार यांचे restuarant सुरळीत चालू देण्याचे मोबदल्यात गेल्या ३ महिन्यांपासून दरमहा तक्रारदार यांच्याकडून लाच स्वीकारात असल्याची कबुली देऊन आज रोजी २५००/- रुपये लाच मागणी करून मागणी केली लाचेची रक्कम स्वीकारलि म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरु आहे.