साने गुरुजी शिक्षण संस्थेच्या मानद सदस्य पदी आ नितेश राणे….!
लाल दिवा-नाशिक,ता.६ :- नाशिक रोड येथील साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या मानद सदस्य पदी भारतीय जनता पक्षाचे आक्रमक आमदार नितेश राणे यांची सर्वानुमती निवड करण्यात आली आहे संस्थेच्या नुकत्याच झालेल्या सभेत हा निर्णय घेण्यात आला.
साने गुरुजी शिक्षण संस्था ही वंचित गरीब घटकाला शिक्षण देणारी संस्था आहे या संस्थेत गरीब विद्यार्थ्यांबरोबरच गरीब महिला मुली शिक्षण घेतात. साने गुरुजी शिक्षण संस्थेच्या झालेल्या बैठकीत संस्थेचे अध्यक्ष प्रवीण जोशी खजिनदार मिलिंद पांडे सचिव अनिल अरिंगळे सदस्य भूषण कानवडे यांनी एकमताने नितेश राणे यांना मानाचे पद बहाल केले असून नुकतेच त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले आहे. साने गुरुजी शिक्षण संस्थेचा सर्वांगीण विस्ताराबरोबरच, शिक्षक बांधवांना येणाऱ्या प्रशासकीय अडचणी दूर करून संस्थेतील शिक्षकांच्या पाठीमागे भक्कम पनाने उभे राहू अशी प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी दिली आहे.
फोटो – आमदार नितेश राणे यांना पत्र देताना प्रवीण जोशी डॉ. भूषण कानवडे.