मराठा आरक्षण आंदोलनाची एस आय टी चौकशी….संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार सखोल तपास….!

लाल दिवा : राज्यातील मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान गेल्या काही महिन्यात झालेल्या हिंसक घटना व तत्सम बाबींची” सखोल चौकशी करण्याकरीता संदिप कर्णिक (भापोसे), पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांच्या अध्यक्षतेखाली “विशेष तपास पथक (SIT)” गठीत करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे

विशेष तपास पथकाने चौकशी करतांना राज्यात आरक्षणाविषयी विविध ठिकाणी आंदोलने सुरु असतांना आंदोलनाचा गैरफायदा घेऊन सामाजिक सलोखा /वातावरण अस्थिर करण्यासाठी जाळपोळ, दगडफेकी सारख्या हिंसक घटना जाणिवपूर्वक करण्याचा प्रयत्न करणे तसेच मिडिया, सोशल मिडियाचा गैरवापर करुन चुकीची माहिती देऊन तसेच अफवा पसरवून दंगे भडकविण्याचा प्रयत्न करणे, या व इत्यादी बाबींसंदर्भात चौकशी/तपास करुन तीन महिन्यात शासनास चौकशी करून तीन महिन्याच्या कालावधी अहवाल द्यावा लागणार आहे.

 

संदीप कर्णिक यांना कोणते अधिकार देण्यात आले?

 

तपास पथकांच्या अध्यक्षांना सरकारने काही अधिकार बहाल केले आहेत. तपासासाठी तज्ज्ञ व्यक्तींना बोलावता येऊ शकेल. शिवाय, तपासासाठी लागणारे मनुष्यबळही सरकारकडून संदीप कर्णिक यांना पुरवण्यात येणार आहे. 

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!