इम्पॅक्ट कॉमर्स अकॅडमीच्या सीए विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश…!
लाल दिवा-नाशिक,ता.११:-दि. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) डिसेंबर २०२३ मध्ये घेतलेल्या सीए फाउंडेशन परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. जुन्या अभ्यासक्रमावर आधारित ही शेवटची परीक्षा होती. देशपातळीवर सुमारे ३०% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
नाशिक स्थित इम्पॅक्ट कॉमर्स अकॅडमीचे जवळपास ८०% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून *नमन जैन* या विद्यार्थ्याने एकूण ३१५ गुण मिळवत दैदिप्यमान यश प्राप्त केले आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे नमन जैन हा विद्यार्थी विज्ञान शाखेतून वाणिज्य शाखेत आलेला विद्यार्थी असूनही त्याने अकाउंट्समध्ये ८० आणि गणित विषयात ९४ गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.
उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे अकॅडमीचे संचालक सीए मकरन्द जैन, सीए प्रज्ञा डागा, सीए नील शाह व सीए भरत तुलसियानी यांनी अभिनंदन केले. अकॅडमीच्या सीए फाउंडेशन च्या या पहिल्याच बॅचमध्ये उत्तुंग यश प्राप्त करून अकॅडमीने निश्चितच एक उल्लेखनीय ठसा उमटवला आहे.