सणासुदीत दहशतीला लगाम: कुख्यात गुन्हेगार सुरज सिंग एमपीडीए अंतर्गत जेरबंद..

पोलीस आयुक्त कर्णिक म्हणाले, ‘अशा गुन्हेगारांना आम्ही थारा देणार नाही.'” 

लाल दिवा -नाशिक,दि.३ : शहरात दहशत माजवणाऱ्या आणि सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण करणाऱ्या कुख्यात गुन्हेगार सुरज त्रिपुरारी सिंगला पोलिसांनी एमपीडीए कायद्यान्वये वर्षभरासाठी जेरबंद केले आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

“सणासुदीच्या काळात शहरातील वातावरण बिघडू देणार नाही,” असे आयुक्त कर्णिक म्हणाले. “समाजविघातक कारवाया करणाऱ्यांना आम्ही थारा देणार नाही.”

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजवणाऱ्या सुरज सिंग (२४, कार्तिकेय नगर) याच्यावर खुनाचा प्रयत्न, लैंगिक छळ, जबरी चोरी असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला नाशिक शहर आणि ग्रामीण जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. तरीसुद्धा तो गुप्तपणे शहरात परत येऊन गुन्हेगारी कृत्य करत होता.

पोलीस उपायुक्त (परिमंडळ-२) मोनिका राऊत यांच्या प्रस्तावानुसार आयुक्त कर्णिक यांनी सिंगला एमपीडीए कायदा १९८१ च्या कलम ३(२) अंतर्गत ३१ ऑगस्ट २०२४ रोजी मध्यवर्ती कारागृह, नाशिकरोड येथे स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. सिंग हा एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आलेला ११ वा गुन्हेगार आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!