सिटीसर्वे च्या चुका त्वरित दुरुस्त करण्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे अधिकाऱ्यांना आदेश …!
लाल दिवा – नाशिक, ता.१४: महापालिका क्षेत्रातील विविध भागात भूमि अभिलेख कार्यालय मार्फत सिटीसर्वे लागू झालेला आहे मात्र तो लागू करताना बऱ्याच अक्षम अशा चुका त्यात करण्यात आलेले आहे त्या त्वरित दुरुस्त कराव्यात अशा सूचना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केल्या.
म्हसरूळ, मखमलाबादला
पूर्वीचे असलेले सर्व पोटहिस्से एकत्रीकरण केलेले आहेत, पंचकला सातबारा नोंदी सिटी सर्व्हेला घेताना क्षेत्र कमी केले आहे, काही ठिकाणी दोन दोन तीन तीन सर्वे नंबरचे एकत्रिकरण केलेले आहे अशा अनेक तक्रारी असून याबाबत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या.
श्री विखे यांनी भूमी अभिलेख चे अधिकाऱ्यांना सदर चुका जागेवर दुरुस्त करण्याचे आदेश दिले आमदार राहुल ढिकले आमदार सीमाताई हिरे भाजपा शहर अध्यक्ष गिरीश पालवे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे जिल्हाधिकारी गंगाधरण डी भूमी अभिलेख चे तालुका उपाध्यक्ष बिपिन काजळे उपस्थित होते माजी नगरसेवक गोकुळ पिंगळे संजय फडोळ नारायणराव काकड उत्तमराव काकड पंडितराव तिडके माणिकराव काकड किरण पिंगळे योगेश पिंगळे रवींद्र पिंगळे मनोज आरोटे आदी शेतकरी बांधव उपस्थित होते महसूलमंत्र्यांनी भूमी अभिलेख चे अधिकारी बिपिन काजळे यांना बोलावून घेऊन त्या ठिकाणी झालेल्या चुका जागेवर अपिल न करता दुरुस्त करण्याचे आदेश दिले