भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य पदी महेश भामरे यांची नियुक्ती ..!
लाल दिवा, ता. २३ : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य पदी महेश भामरे यांची नियुक्ती केली आहे. आज दिनांक २३ मे २००३ रोजी मुंबईत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांच्या हस्ते भामरेंना नियुक्तीपत्र देण्यात आले.
प्रदेश कार्यकारिणी सदस्य पदी निवड झाल्याबद्दल महेश भामरेंचे उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार, नाशिक प्रभारी ना गिरीश महाजन, आ देवयानी फरांदे, आ सीमा हिरे, आ. राहुल ढिकले, आ राहुल आहेर, आ दिलीप बोरसे, कार्यकारिणी सदस्य लक्ष्मण सावजी, नाशिक शहराध्यक्ष गिरीश पालवे, जिल्हाध्यक्ष केदा आहेर, मा आ बाळासाहेब सानप, ज्येष्ठ नेते विजय साने, मा महापौर सतिष कुलकर्णी, अनुसूचित जाती मोर्चा गणेश कांबळे, मा सभागृह नेते दिनकर पाटील, युवा अध्यक्ष अमित घुगे, जगन पाटील, बाळासाहेब पाटील, जगदीश पाटील, महिला शहराध्यक्ष हिमगौरी आडके, मंडल अध्यक्ष सुनिल देसाई, नाना शिलेदार, मिलिंद भालेराव, ओबीसी शहराध्यक्ष चंद्रकांत थोरात, उदय जोशी यांनी अभिनंदन केले आहे.