माजी सैनिक विश्रामगृहात पहारेकरी व सफाईवाला पदाची हंगामी पदभरती…!

लाल दिवा-नाशिक, दि. 12 :-छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिकरोड अधिनस्थ असलेले माजी सैनिक विश्रामगृह, नोंदणी भवन शेजारी, नाशिकरोड, नाशिक येथे पहारेकरी (निवासी पद) व सफाईवाला पदाची तात्पुरत्या स्वरूपात पदभरती करावयाची आहे. जिल्ह्यातील इच्छुक माजी सैनिक व नागरिकांनी 22 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता संबंधित पद कौशल्‍य चाचणीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय आयुक्त कार्यालय परिसर,नाशिकरोड, नाशिक येथे उपस्थित रहावे,

असे आवाहन प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिकरोड, नाशिक लेफ्पनंट कर्नल विलास सोनवणे (निवृत्त) यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

 

पहारेकरी (पुरूष) व सफाईवाला (पुरूष) प्रत्येकी 1 पद हे ताप्तुरत्या स्वरूपाचे असून या पहारेकरी पदासाठी शिक्षण 10 वी पास असणे आवश्यक असून या पदासाठी रूपये 20 हजार 886 इतके मानधन देय आहे. तर सफाईवाला पदासाठी रूपये 13 हजार 89 इतके मानधन देय आहे. दोन्ही पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 मार्च, 2024 रोजी 50 वर्षापेक्षा जास्त नसावे. सदर पद भरतीमध्ये माजी सैनिक व अनुभवी उमदेवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

 

अधिक माहितीसाठी 0253-2451032 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा 9156073306 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिकरोड, नाशिक लेफ्पनंट कर्नल विलास सोनवणे (निवृत्त) यांनी कळविले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!