नाशिक रोड: बँकेचे कुलूप फोडून फ्लॅट हिसकावला! धिवरे दांपत्यावर गुन्हा दाखल!
नाशिक रोड: बँकेच्या ताब्यातील फ्लॅटमध्ये अनाधिकृत प्रवेश: धिवरे दांपत्य अटक
लाल दिवा-नाशिक,दि.४:-नाशिकरोड पोलीस स्टेशनमध्ये दि. 03-09-2024 रोजी एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. फिर्यादी प्रविण लक्ष्मण अंतरवेलीकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, नाशिकरोड येथील श्री गजानन पार्क अपार्टमधील एका फ्लॅटला मा. कोर्टाच्या आदेशानुसार दि. 21-08-2024 रोजी बँकेच्या ताब्यात दिले होते आणि फ्लॅटला बँकेचे कुलूप लावले होते. मात्र, जयपाल प्रल्हाद धिवरे आणि त्यांची पत्नी गायत्री धिवरे यांनी विनापरवानगी हे कुलूप तोडून फ्लॅटमध्ये अनाधिकृतपणे प्रवेश केला आणि तेथे राहू लागले. या प्रकरणी पोलीसांनी धिवरे दांपत्याविरुद्ध भारतीय दंड संहिताच्या कलम 329 (4) आणि 3 (5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
तपास पोहवा सानप यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1