रणरागिनी पथकातील महिला पोलीस अंमलदारांनी वाडीवऱ्हे हद्दीतील……. वालदेवी नदीच्या बेटावर अवैधरित्या सुरू असलेली गावठी दारू हातभट्टी केली उध्वस्त….!
लाल दिवा-नाशिक,ता.२२ : नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री शहाजी उमाप यांचे आदेशान्वये जिल्ह्यातील गावठी दारू हातभट्ट्या नेस्तनाबूत करण्यासाठी ग्रामीण पोलिसांच्या रणरागिनी पथकाची धडक कारवाई सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर रणरागिनी पथकातील महिला पोलीस अंमलदारांनी वाडीव-हे पोलीस ठाणे हद्दीतील मुळेगाव शिवारात वालदेवी नदीच्या डोहदऱ्याच्या ओहोळातील बेटावर अवैधरित्या सुरू असलेली गावठी दारू हातभट्टी उध्वस्त केली आहे.
सदर बेटावर धूर दिसत असल्याचे पथकाचे निदर्शनास आल्यावर, महिला अंमलदारांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून, त्या ठिकाणी होडीतून बसून जाऊन, अवैधरित्या सुरू असलेली हातभट्टी उध्वस्त करून, गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे अंबट उग्र वासाचे रसायन व इतर साहित्य साधने असा मुद्देमाल नष्ट केला आहे. सदर प्रकरणी वाडीवऱ्हे पोलीस ठाणे येथे अज्ञात इसमाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई रणरागिणी पथकातील महिला पोहवा सोनाली केदारे, मपोना सत्यभामा सोनवणे, संगीता राठोड, वैशाली डावरे, वर्षा पवार, पोकॉ विलास सूर्यवंशी, पोहवा पुरुषोत्तम मोरे या पथकाने सदर कारवाई केली आहे.