नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेत ‘दिनदर्शिका’ प्रकाशन संपन्न…..!
लाल दिवा-सिडको, ता. २८ : नाशिक जिल्हयातील सरकारी कर्मचारी यांची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेत सन २०२४ या वर्षाचे दिनदर्शिका प्रकाशन नाशिक जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र परदेशी यांचे हस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रमाप्रसंगी रविंद्र परदेशी बोलत होते. सरकारी कर्मचारी यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सभासदांच्या पाल्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी तसेच गृह कर्जा सारख्या योजना राबवुन बँकेने आपल्या सभासदांना भक्कम आधार देण्याचे कार्य यापुढील काळात अधिक जोमाने करावे. रिझर्व्ह बँकेच्या बँकींग धोरणात वेळोवेळी होणारे बदलांची तत्वतः अमलबजावणी करावी. संस्थेचा आर्थिक आलेख बघुन समाधान व्यक्त केले. येत्या पाच वर्षात एक हजार कोटी व्यवसायाचे व पाचशे कोटी रुपये ठेवी संकलीत करण्याचा प्रयत्न संचालक मंडळाने करावा. असे आवाहन केले. बँकेबद्दल आपणांस नेहमीच आपुलकी असल्यामुळे एन.पी.ए.वाढू नये यासाठी कर्जदार सभासदांची वेतनातून कपात करुन देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन श्री परदेशी यांनी यावेळी दिले.
कार्यक्रमाप्रसंगी बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे पाटील व उपस्थित सर्वानी श्री परदेशी यांचा पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले. त्यांचे बँकेला नेहमीच सहकार्य असते. यापुढेही राहील अशी सदिच्छा व्यक्त केली. यावेळी संचालक प्रमोद निरगुडे, अजित आव्हाड, मंदाकिनी पवार व रविंद्र आंधळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब बडाख यांनी केले. कार्यक्रमास संचालक धनश्री कापडणीस, रविंद्र बाविस्कर, विजय देवरे, विक्रम पिंगळे, अमोल बागुल, भरत राठोड तसेच बँकेचे अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
नाशिक : जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेत ‘दिनदर्शिका’ प्रकाशन करताना मान्यवर