पोलीस अधिकाऱ्यांनो निरोप समारंभाच्या वेळी प्रोटोकॉल पाळा.. …. अन्यथा तुमच्यावर होणार कारवाई…. पोलीस महासंचालकांच्या आदेशाने पोलीस अधिकाऱ्यांचे दणाणले धाबे…..पोलीस अधिकारी यांच्या निरोप समारंभात गणवेष परिधान करत रंगीत फेटे बांधणे, त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करणे, त्यांना वाहनात बसवुन वाहनास दोरीने ओढत नेणे हे प्रकार यापुढे चालणार नाही….!

लाल दिवा : महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील विविध दर्जाच्या पोलीस अधिकारी अंमलदार यांच्या शासन नियमानुसार तसेच प्रशासकीय कारणास्तव बदल्या होत असतात. बदली (Transfer) ही एक नित्याची बाव (Routine Procedure) आहे. अशा एका घटकातुन ठिकाणाहुन दुस-या घटकांत ठिकाणी बदली झालेल्या पोलीस अधिकारी यांच्या सन्मानार्थ विविध पोलीस ठाणे शाखांमध्ये निरोप समारंभ आयोजित केले जातात. अशा समारंभांमध्ये संबंधीत पोलीस अधिकारी हे पोलीस गणवेष परिधान केलेला असतांना त्यावर रंगीत फेटे बांधणे, त्यांच्यावर फुलांचा अति प्रमाणात वर्षाव करणे, त्यांना वाहनात बसवुन संबधीत पोलीस ठाणे शाखेच्या अधिकारी अंमलदार यांनी वाहनास दोरीने ओढत नेणे असे प्रकार निदर्शनास आले आहेत. तसेच त्यांना शासकीय वाहनात बसवुन सेवानिवृत्त होणा-या अधिका-यांसारखा त्यांना निरोप दिला जातो. असे प्रकार पोलीस दलाच्या प्रमाणीत कार्यपध्दतीला अनुसरुन नाही.

 अशा प्रकारच्या गौरव सोहळयाचा कार्यक्रम अधिकारी स्वतः किंवा त्यांच्या हस्तकामार्फत स्वस्त प्रसिध्दी मिळविण्यासाठी सोशल मिडीयावर प्रसारीत करतात. त्यामुळे उलट ते जनमाणसात चेष्टेचा उपहासाचा विषय बनतात. स्थानिक नागरिक हे अधिका-याने केलेल्या चांगल्या कामांचा कर्तुत्वाचा नेहमी सन्मान करतात, न की अशा दिखाव्याचा.

तरी, सर्व पोलीस घटक प्रमुखांनी त्यांच्या कार्यक्षेत्रांतर्गत पोलीस ठाण्यांमध्ये शाखांमध्ये बदली झालेल्या पोलीस अधिकारी यांच्या बदलीचा निरोप समारंभ आयोजित करतांना वरील प्रकार होणार नाहीत याची कटाक्षाने दक्षता घेणे आवश्यक असुन आणि तशा सुचना त्यांचे अधिनस्थ सर्व पोलीस ठाणे शाखा प्रभारी अधिकारी, सर्व पर्यवेक्षीय अधिकारी यांना सक्त सुचना देणे आवश्यक आहे.

उपरोक्त सुचनांकडे दुर्लक्ष केल्यास पालन करण्यात कसुरी केल्यास संबंधीतांविरुध्द कडक कारवाई करण्याची जबाबदारी सर्व घटक प्रमुख व त्यांचे पर्यवेक्षीय अधिका-यांची असेल. तसेच अशी कुठलीही बाब पोलीस मुख्यालय यांचे निदर्शनास जर आली तर संबंधीत घटक प्रमुख यांना जवावदार ठरविले जाईल.

(रश्मि शुक्ला) पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!