पोलीस आयुक्तांची अवैध धंद्यावर वक्रदृष्टी…..विशेष पथकाचे पोलीस अधिकारी पंकज भालेराव यांच्या पथकाचा मटका अड्ड्यावर छापा…..!

लाल दिवा-नाशिक,ता.७ : मा. पोलीस आयुक्त साो. नाशिक शहर यांनी अवैध धंदयावर जरब बसविण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्तालयात विशेष पथकाची स्थापना करून कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.

त्या अनुषंगाने विशेष पथकातील अंमलदार पो.अं. २३८९ भगवान जाधव यांना गुप्त बातमीदार यांचे मार्फतीने दत्तनगर, चुंचाळे येथे मटका सरू असल्याची खात्रीशिर बातमी मिळालेली होती. विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी दि. ०६/०२/२०२४ रोजी १६.४० वाजता संदिप पानपाटील यांच्या चाळीच्या समोर, पत्राचे शेडमध्ये, घरकुल रोड, आंबेडकर नगर, चुंचाळे शिवार, नाशिक येथे छापा टाकुन मटका खेळविणारा शाम हरिभाऊ वाघमारे, वय ५० वर्षे, धंदा- व्यापार, रा. साईबाबा नगर, ४१/२/११७/३ राजरत्न नगर, मोरवाडी, सिडको, नाशिक व खेळणारे इतर २१ आरोपीतांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन जुगाराची साहित्य साधने, रोख रक्कम, मोबाईल फोन व मोटार सायकल असा एकुण ४,८३,५६०/-रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगीरी मा.श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त सो. नाशिक, मा.श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त साो. गुन्हे, मा. श्री. डॉ. सिताराम कोल्हे, सपोआ गुन्हे, नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील वपोनि. पंकज भालेराव, सपोनि. प्रविण सुर्यवंशी, सपोनि. हेमंत नागरे, सपोनि. किरण रोंदळे, सपोनि. हेमंत फड, श्रेणी पोउनि. दिलीप भोई, सपोउनि. रंजन बेंडाळे, पोहवा. किशोर रोकडे, पो.ना. योगेश चव्हाण, भुषण सोनवणे, पो. अं. भगवान जाधव, विठ्ठल चव्हाण, अविनाश फुलपगारे, बाळा नांद्रे, चंद्रकांत बागडे, गणेश वडजे, प्रविण चव्हाण, यांनी केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!