पोलीस आयुक्तालयात “राजमाता जिजाऊ सन्मान सोहळा” पडला दिमाखात पार ; एपीआय छाया देवरे यांनी आपल्या सूत्रसंचालनातून सर्वांना केले मंत्रमुग्ध…!

लाल दिवा-नाशिक,ता.१५ : मा. श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांच्या संकल्पनेतुन व मार्गदर्शनाखाली व मा. श्रीमती मोनिका राऊत, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-२, यांचे देखरेखीखाली राजमाता जिजाऊ यांच्या दिनांक १२ जानेवारी रोजीच्या जयंती दिनाचे औचित्य साधुन आजरोजी पोलीस मुख्यालय नाशिक शहर येथे राजमाता जिजाउ सन्मान सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमासाठी अॅड. श्री. नितिन ठाकरे, सरचिटणीस मराठा विदया प्रसारक समाज, नाशिक, श्री. स्वप्नील बच्छाव, उदयोजक, नाशिक, श्री. अजिंक्य वाघ, संचालक के. के. वाघ इंजिनिअरींग कॉलेज, नाशिक, श्री. उध्दव आहीरे, उदयोजक नाशिक, श्री. बापुसाहेब चव्हाण, मराठा मंच पदाधिकारी, नाशिक यांना निमंत्रीत केलेले होते. कार्यक्रमस्थळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पुजन करुन सामुहीक जिजाऊ वंदनेचे गायन करण्यात आले. त्यानंतर मा. श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले.

ज्याप्रमाणे राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना हालाकिच्या परिस्थितीत देखील उत्तम संस्कार देवून त्यांची जडणघडण करुन त्यांचे करवी स्वराज्याची निर्मिती केली. त्याचप्रमाणे आजच्या राजमाता जिजाऊ चे प्रतिनिधीत्व करणा-या माता भगिणी ज्यांनी आपल्या पाल्यांना सुसंस्कारीत करुन उच्च शिक्षण देवून उच्चपदस्थ अधिकारी घडविण्यामध्ये मोलाची कामगिरी केली अशा १) श्रीमती इंदुमती निंबा पगार, २) श्रीमती शोभा भिमराव चव्हाण, ३) श्रीमती छाया चिंतामण पाटील, ४) श्रीमती सुनंदा गुलाबराव पाटील, ५) श्रीमती अलका संजय पगार, ६) श्रीमती संगिता राजेंद्र देशमुख, ७) श्रीमती सुशिला रंगनाथ हांडोरे, ८) श्रीमती शोभा काळु पगार, अशा माता भगिणींचा मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते रोपटे श्री. मारोतराव कन्नमवार लिखीत “राजमाता जिजाबाई” हे पुस्तक देवून सन्मान करण्यात आला.

श्रीमती विजया दुधारे शिक्षीका नाशिक यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जिवनाबदद्ल विस्तृत अशी माहितीपर भाषण सादर केले. उपस्थित मान्यवरापैकी राजमाता जिजाऊ सन्मान सोहळया निमित्त अॅड. श्री. नितिन ठाकरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

https://www.facebook.com/100069362311166/posts/pfbid0SVEJckcTRejqNXV4rVkbQ94xUQjXy6iGFeuFd8bwAy5i3oZehW7dhc253PwofexZl/?mibextid=CDWPTG

 

 

 

 

सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन स.पो.निरी. श्रीमती छाया देवरे, व श्री. योगेश कड यांनी केले. व आभारप्रदर्शन श्रीमती मोनिका राऊत, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-२, नाशिक शहर यांनी केले. सदर कार्यक्रम उपस्थित मान्यवर तसेच मा. श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर, मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उपआयुक्त (गुन्हे), मा.श्री. किरणकुमार चव्हाण पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-१, मा. श्रीमती मोनिका राऊत, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-२, नाशिक शहर मा. श्री. चंद्रकांत खांडवी, पोलीस उपआयुक्त, (मुख्यालय), नाशिक शहर, मा. डॉ. श्री. सिताराम कोल्हे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे), नाशिक शहर व पोलीस ठाणे कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे उपस्थितीत पार पडला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!