पोलीस आयुक्तांनी सुरू केलेल्या “मॉर्निंग वॉक” उपक्रमाचे नागरिकांनी केले तोंड भरून कौतुक…..!
लाल दिवा-नाशिक,ता २४ :- पोलीस हा गणवेशातील नागरीक असुन नागरीक हे साध्या वेषातील पोलीस आहेत. त्यामुळे समान निकोप राहण्यासाठी दोघांमधिल असणारा समन्वय व सुसंवाद सौहार्दपूर्ण असणे गरजेचे आहे ही बाब मा. श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी विचारात घेवून त्यांच्या संकल्पनेतुन नागरीकांशी सुसंवाद साधण्यासाठी, पोलीसांच्या कामकाजा संबधात नागरीकांकडून फिडबॅक घेण्यासाठी आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी नाशिक शहरातील सर्व पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात असलेल्या ३५ जॉगींग ट्रॅकला आज दिनांक २४/०२/२०२४ रोजी सकाळी ०७.०० वाजता वरीष्ठ पोलीस अधिका-यांनी भेटी देवून त्याठिकाणी मॉर्निंग वॉक करीत असलेल्या नागरीकांच्या प्रत्यक्ष भेटी घेवुन नागरीकांशी संवाद साधला. त्यामध्ये जेष्ठ नागरीक, महिला, खेळाडु तसेच स्पर्धा परिक्षांची तयारी करणारे यांच्याशी मैत्रीपुर्ण संवाद साधुन त्यांना असणा-या समस्या जाणुन घेवून त्यांना मार्गदर्शन केले. तसेच गोल्फक्लब ग्राऊंड या ठिकाणी स्वतः मा. पोलीस आयुक्त यांनी भविष्याकडे अपेक्षेने पाहणा-या व स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणा-या तरुणांना वेळेचे नियोजन सांगुन २४ तासातील ६ तास आरामाचे सोडून कमीत कमी १४ ते १५ तास अभ्यास केल्यास यश निश्चीत आहे असे मार्गदर्शन केले.
इतर जॉगींग ट्रॅकचे ठिकाणी मा. श्री प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) हे इंदिरानगर जॉगींग ट्रॅक, मा. श्रीमती मोनिका राऊत, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२ हया डीजीपी नगर नॉगींग ट्रॅक, मा. श्री. चंद्रकांत खांडवी, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) हे पांडवलेणी, मा. किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१ हे कृषीनगर जॉगींग ट्रॅकवर यांनी तसेच अन्य नॉगींग ट्रॅक वर सर्व सहा. पोलीस आयुक्त, सर्व पोलीस निरीक्षक यांनी नागरीकांशी संवाद साधला. त्यांनी पोलीस विभागाशी व इतर विभागाशी निगडीत त्यांना असणा-या सार्वननिक तसेच खाजगी समस्यांबाबत माहिती दिली. बहुतेक समस्या हया पार्किंगशी निगडीत होत्या. त्यापैकी ज्या बाबी पोलीस विभागाशी संबंधीत आहेत त्या तात्काळ सोडविण्याबाबत मा. पोलीस आयुक्त यांनी संबधीत पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना व बिट अंमलदार यांना आदेशित केले व इतर विभागाशी निगडीत समस्या बाबत संबधीत विभागाला लेखी कळविण्याबाबत सुचित केले. नागरीकांना काही माहिती सांगावयाची असल्यास सी.पी व्हॅटस्अप क्रमांक जनतेसाठी खुला असुन तात्काळ मदत हवी असल्यास डायल ११२ सुविधा उपलब्ध असल्याचे सांगितले.
- नाशिक शहरातील विविध ठिकाणी असलेल्या जॉगींग ट्रॅकच्या ठिकाणी मा. श्री. संदिप कर्णिक,
- पोलीस आयुक्त, नाशिक शहर, मा. श्री प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त (गुन्हे)
- मा. श्री. चंद्रकांत खांडवी, पोलीस उपआयुक्त (मुख्यालय),
- मा. श्रीमती मोनिका राऊत, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२,
सर्व सहा. पोलीस आयुक्त,सर्व पोलीस ठाणे/शाखा प्रभारी अधिकारी तसेच इतर पोलीस अधिकारी अशा एकुण जवळपास १०० पोलीस अधिकारी यांनी नागरीकांच्या भेटी घेवून समस्या जाणुन घेतल्या आहे.