पत्रकारास अपमानास्पद वागणूक दिल्या प्रकरणी पोलीस आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश ….!
लाल दिवा-नाशिक,ता .२६:- पत्रकार भाई सोनार यांना अपमानास्पद वागणूक दिल्या संदर्भात पत्रकारांनी पोलीस आयुक्तांना निवेदन दिले. यावेळी पोलीस आयुक्तांनी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांना सदर घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. या संदर्भात पत्रकारांनी पोलीस आयुक्तांच्या भूमिकेबाबत समाधान व्यक्त केले आहे.
पत्रकार भाई सोनार यांना गेल्या दोन दिवसांपूर्वी इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे यांनी अपमानास्पद वागणूक दिली होती. या संदर्भात मंगळवारी सायंकाळी नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीपजी कर्णिक यांची भेट घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्याला योग्य ती समज देण्यात येईल असे सांगितले. यावर पत्रकारांनी समाधान मानले.
याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार सतीश रूपवते, प्रमोद दंडगव्हाळ, भाई सोनार, निशिकांत पाटील, दिनेश जाधव, किरण आहेर, सागर चौधरी, भगवान थोरात आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले की, सध्या आचारसंहिता असल्यामुळे बदलीचा विषय किचकट आहे. परंतु याबाबत योग्य ती चौकशी करण्याचे आदेश त्यांनी उपस्थित असलेल्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांना दिले.