पोलीस आयुक्त येशू ख्रिस्तासमोर नतमस्तक….!
लाल दिवा-नाशिक,ता .६ : – उपनगर पोलीस स्टेशन हद्दीतील बाळयेशू चर्च, झेवियर्स स्कूल, नाशिक पुणे रोड येथील फादर – एरोल फर्नांडिस त्यांच्यासोबत बाळे येशू चर्च यात्रा निमित्त मा. पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब, पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत , सहाय्यक पोलीस उपायुक्त श्री सचिन बारी, पोलीस आयुक्तांचे जनसंपर्क अधिकारी लोंढे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, दिनकर कदम, नाशिक रोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, आदींनी भेट दिली असून सदर बाळ येशू यात्रा हि दि. 10 फेब्रुवारी 24 ते दि. 11 फेब्रुवारी 24 रोजी बाळ येशू मोठ्या प्रमाणात साजरी आहे सदर यात्रा करिता 60 ते 70 हजार भाविक दर्शनाकरिता येतात असतात
सालाबादाप्रमाणे या वर्षी शनिवार दिनांक 10 फेब्रूवारी व रविवार 11 फेब्रुवारी 2024 रोजी ही नियोजित बाळ येशूची यात्रा संपन्न होत आहे. त्या अगोदर दिनांक 1 ते 9 फेब्रुवारी 2024च्या काळावधीत नव दिवसाची विशेष नोव्हेना (प्रार्थना) आयोजित केली जात आहे.
गुरुवार दिना ंक 1 फेब्रुवारी पासून नऊ दिवसाची नोव्हेना व पवित्र ख्रिस्तबलिदान सोहळा (ख्रिस्ती उपासनाविधी) रोज सकाळी 6 वाजता (इंग्रजीत), 10.30 वाजता (मराठीत) दुपारी 12 वाजता (इंग्रजीत), दुपारी 4 वाजता (कोंकणीत) सांयकाळी 6 वाजता (इंग्रजीत) व सांयकाळी 7 वाजता (मराठीत) आयोजित करण्यात येईल
शनिवार, 10 फेब्रुवारी 2024 रोजी, सेंट झेवियर हायस्कूलच्या प्रांगणात उभारलेल्या शामियानात दर तासाला सकाळी 6 ते सांयकाळी 8 वाजेपर्यंत भाविकांसाठी पवित्र मिस्सा बलिदान अर्पण केला जाईल. तसेच रविवार दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 6 ते दुपारी 1 वाजेपर्यंत भाविकांसाठी पवित्र मिस्सा बलिदान अर्पण केला जाईल. बाळ येशू यात्रेची सांगता रविवारी दिनांक 11 फेब्रुवारी 2024 दुपारी 1 वाजता होईल.
आपणांस विनंती करण्यात येते की बाळ येशू मंदिर व सेंट झेवियर शाळेच्या परिसरात व (नाशिक-पुणे महामार्ग) मुख्य रस्त्यावर रहदारी नियंत्रण व समाजविघातक घटकापासून सुरक्षा कारणास्तव कृपया या काळात पोलीस बंदोबस्ताची व्ववस्था करण्याची विनंती करण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षे आपणांकडून मिळत असलेल्या मौल्यवान सेवेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या वर्षी सुद्धा फेब्रुवारी 2024 मध्ये आपण बाळ येशू यात्रे प्रसंगी सहकार्य कराल याची आम्हाला खात्री आहे. आपला कृपाभिलाषी २ Krolsi फादर एरॉल फर्नांडीस, येशू संघीय धर्मगुरु, बाळ येशू तीर्थस्थान, नाशिक रोड.