ढकांबे येथील पेट्रोलपंपावर दरोडा टाकणारी टोळी ग्रामीण पोलीसांच्या जाळयात (०२) आरोपी अटकेत, इतर आरोपींसाठी पोलीसांची शोधमोहिम….!
लाल दिवा-नाशिक,१ : दिनांक २३/१०/२०२३ रोजी मध्यरात्रीचे सुमारास दिंडोरी तालुक्यातील ढकांबे शिवारात असलेल्या मातोश्री पेट्रोलपंपावर अज्ञात इसमांनी तेथील लॉक नसलेल्या कॅबीनमध्ये प्रवेश करून पंपावरील कामगारांना पिस्टल व लोखंडी रॉडचा धाक दाखवून, मारहाण करून कॅबीनमधील टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली रोख रक्कम व कामगारांचे मोबाईल फोन असा एकूण ३१ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल बळजबरीने चोरून नेल्याबाबत दिंडोरी पोलीस ठाणेस गुरनं ५३४ / २०२३ भादवि कलम ३९५ सह आर्म अॅक्ट ३ / २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार कांगणे यांनी सदर घटनेचा आढावा घेवून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास वरील गुन्हा उघडकीस आणणेसाठी मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील यांना सदर गुन्हयातील साक्षीदार यांनी सांगितलेले आरोपींचे वर्णन व त्यांची बोलीभाषा यावरून गोपनीय माहिती काढून, तांत्रीक बाबींची पडताळणी करून यातील गुन्हेगार हे दिंडोरी तालुक्यातील करंजाळी शिवारातील असल्याचे खात्रीशीररित्या समजले. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेवून, पालखेड चौफुली परिसरात सापळा रचून संशयीत नामे १) सुनिल रमेश डंबाळे, वय २४ व २) ज्ञानेश्वर सदु गायकवाड, वय २१, दोघे रा. कापाची करंजाळी, ता. दिंडोरी यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांचेकडे वरील गुन्हयाचे तपासात चौकशी केली असता, त्यांनी त्यांचे साथीदार ३) किरण दशरथ माळेकर, ४) अनिल बाळु माळेकर, रा. कापाची करंजाळी, ता. दिंडोरी, व ५) राहुल वारडे, रा. सारसाळे, ता. दिंडोरी यांचेसह मिळून सदर गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे.
यातील ताब्यात घेतलेले आरोपी सुनिल डंबाळे व ज्ञानेश्वर गायकवाड यांचेकडे वरील गुन्हयाचे तपासात अधिक चौकशी केली असता, त्यांनी त्यांचे वरील साथीदारांसह मिळून गेल्या आठवडयात ढकांबे शिवारातील एका पेट्रोलपंपावर रात्रीचे सुमारास बजाज पल्सर मोटरसायकलने येवून पंपातील कॅबीनमध्ये प्रवेश करून तेथील कामगारांना पिस्टलसारखी दिसणारी वस्तू व लोखंडी रॉडचा धाक दाखवून, मारहाण करून रोख रक्कम व मोबाईल फोन जबरीने चोरून नेले असल्याचे तपासात समोर आले आहे.
सदर आरोपींचे कब्जातून वरील गुन्हयामध्ये वापरलेल्या बजाज पल्सर २२० व बजाज पल्सर एन. एस. अशा दोन मोटर सायकल, गुन्हयात चोरी गेलेले कामगारांचे दोन मोबाईल फोन व पिस्टलसारखे दिसणारे लायटर असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. यातील ताब्यात घेतलेले आरोपी सुनिल डंबाळे व ज्ञानेश्वर गायकवाड यांना वरील गुन्हयात अटक करण्यात आली असून त्यांना मा. न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांची तीन दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोउनि कैलास देशमुख, दिंडोरी पोलीस स्टेशन हे करीत आहे. यातील आरोपींचे
इतर साथीदारांचा पोलीस पथक शोध घेत असून त्यांचेकडून मालाविरूध्दचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार कांगणे यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील, सपोनि श्री. सागर कोते, सपोनि श्री. गणेश शिंदे, पोउनि संदीप पाटील, पोउनि नाना शिरोळे, पोहवा नवनाश माता गोता विश्वनाथ काकर टेमंत गिलबिले लिए बटिस आउट मोगलगांने काने वरील