भाग तिसरा (३)….. सोनवणे प्रकरणाचा वडील चव्हाण यांनी केला धक्कादायक खुलासा…. श्री स्वामी समर्थ केंद्राचे विश्वस्त व पोलिसांचा केला भांडाफोड……!

लाल दिवा : श्री स्वामी समर्थ केंद्राच्या विश्वस्तांना एका व्हिडिओ क्लिप ची धमकी देऊन खंडणी मागितल्या प्रकरणी सारिका सोनवणे यांच्यावर काही महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासंदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रकारची चर्चा रंगली. वास्तव आणि या घटनेमागची गुढ काही वेगळेच आहे. अशा प्रकारचा कयास देखील लावण्यात आला.

सारिका सोनवणे यांच्यावर चार ते पाच ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये त्यांची सेंट्रल जेलमध्ये रवानगी करण्यात आली. जामीन मिळणार नाही. याचा पुरेपूर इंतजाम करण्यात आला. यात काही राजकीय मंडळी इंव्हॉल्व असल्याचे सुद्धा बोलण्यात आले.

यात कोट्यावधी रुपयांचे व्यवहार झाला. अशी देखील चर्चा रंगली. दिल्ली-मुंबईवरून हालचाली सुरू असल्याचे सांगण्यात आले. सेंट्रल जेलमध्ये सारिका सोनवणे त्यांचा भाऊ व मुलगा यांना अनेक दिवस कारागृहात शिक्षा भोगावी लागली. वास्तविक पाहता हे प्रकरण काही वेगळेच आहे. असेही सांगण्यात आले. आज नाहीतर उद्या या प्रकरणातील आसाराम बापू नक्कीच बाहेर येईल व आम्हाला न्याय मिळेल असे त्यांचे नातेवाईक म्हणून लागले. अखेर सारिका सोनवणे यांचे वडील वैतागलेल्या अवस्थेत नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते गजू घोडके यांच्या भेटीसाठी आले. माझ्या मुलीला, मुलाला व नातवाला न्याय द्या अशी विनवणी करू लागले. त्यानंतर गजू घोडके यांनी सदर प्रकरणाबाबत पंचवटी पोलीस ठाणे, जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन सदर घटनेची चौकशी करून त्या पीडित महिलेला न्याय द्यावा अशी निवेदन दिले. या प्रकरणावर आवाज उठवल्याने गजू घोडके यांना वारंवार पोलिसांनी देखील चौकशीसाठी बोलाविले. या घटनेचे तथ्य बाहेर आले पाहिजे. याकरता सारिका सोनवणे यांच्या वडिलांनी मीडियासमोर येत सदर घटनेचा भांडाफोड केला. सोनवणे यांच्या वडिलांच्या बोलण्यात पोलीस व श्री स्वामी समर्थ केंद्र यांची पोळखोल करण्यात आली. आमच्या जीवाचे काहीही होऊ शकते. त्यास आम्ही तयार आहोत. असेही गजू घोडके यांनी याप्रसंगी सांगितले. गजू घोडके यांच्या म्हणण्यानुसार सत्य कितीही कटू असले तरी ते सत्य असते. ते एक दिवस बाहेर येणार आणि सारिका सोनवणे यांना न्याय मिळणार असेही त्यांनी यावेळी अपेक्षा व्यक्त केली. तर सारिका सोनवणे यांच्या वडिलांनी मात्र धक्कादाय खुलासा केल्याने एकच खळबळ उडली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!