सिटी सेंटर मॉल व पोलीस मुख्यालयात….. महाराष्ट्र पोलीस स्थापना सप्ताह व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन…..!
लाल दिवा-नाशिक,ता.७ : महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना २ जानेवारी १९६१ साली करण्यात आली. तत्कालीन पंतप्रधान श्री. पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला त्या दिवसा पासुन २ जानेवारी हा पोलीस स्थापना दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. तसेच २ जानेवारी ते ८ जानेवारी हा पोलीस सप्ताह म्हणुन साजरा करण्यात येतो. सदर काळात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. सदर कार्यक्रमा द्वारे पोलीस दलाचे कामकाजा बाबत माहिती दिली जाते
महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापना दिनाच्या अनुषंगाने पोलीस दलाचे कामकाजा बाबत नागरीकांपर्यंत माहिती पोहचविण्या करीता गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीत सिटी सेंटर मॉल येथे ६ जानेवारी व ७ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी १८:०० ते २०:०० वाजे दरम्यान पोलीस दला मार्फतीने १) पोलीस इतिहास, २) सायबर पोलीसींग, ३) ट्रॉफिक पोलीसींग, ४) डायल ११२, ५) बी.डी.डी.एस, ६) शस्त्र, ७) दामिनी पथक असे स्टॉल लावण्यात आले असुन सदर स्टॉलचे प्रदर्शन हे मोफत आहे. सदर स्टॉलचे
उद्घाटन हे आजरोजी दि.०६/०१/२०२३ रोजी सायंकाळी १८:०० वाजता सिटीसेंटर मॉल, लवाटे नगर, नाशिक येथे मा.श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचेहस्ते करण्यात आले. तसेच सिटीसेंटर मॉल येथे उपस्थित असलेल्या चिमुकल्या मुलांकडून तिरंगा रंगाचे फुगे सोडून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. सदरवेळी
- श्री. किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१नाशिक
- शहर,श्रीमती मोनिका राउत, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-२,नाशिक,
- श्री. चंद्रकांत खांडवी, पोलीस उप आयुक्त, मुख्यालय, नाशिक शहर,
- श्री. नितीन जाधव, सहा. पोलीस आयुक्त,
- पंचवटी विभाग, नाशिक शहर, श्री. डॉ. सिध्देश्वर धुमाळ, सहा. पोलीस आयुक्त, सरकारवाडा विभाग,
- नाशिक शहर,
- श्री. शेखर देशमुख, सहा. पोलीस आयुक्त, अंबड विभाग, नाशिक शहर,
- श्री. आनंदा वाघ,सहा. पोलीस आयुक्त,नाशिकरोड विभाग,नाशिक शहर,
- श्री. सचिन बारी, सहा. पोलीस आयुक्त, शहर वाहतुक शाखा, नाशिक शहर,
- श्री. श्रीकांत निंबाळकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गंगापुर पो.स्टे.,
- श्री. रियाज शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पो.स्टे.,
- श्री. दिलीप ठाकुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,सरकारवाडा,
- श्री. पत्की, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंबईनाका,
- श्री. पगार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,इंदिरानगर
असे अधिकारी व पोलीस अंमलदार असे उपस्थित होते. सदर वेळी नागरिकांनी मोठ्या
प्रमाणात गर्दी करून प्रतिसाद दिला व वरील स्टॉलला भेट देवुन पोलीस दलाच्या कामकाजाची माहिती करून घेतली.
तरी नाशिक पोलीस दला मार्फतीने सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, सदरचे प्रदर्शन हे उदईक दि.०७/०१/२०२४ रोजी देखील सुरू राहणार असुन परवा दि.०८/०१/२०२४ रोजी सकाळी पोलीस परेड ग्राउंड याठिकाणी पोलीस दलातील व शाळेतील लहान मुलांची परेड असणार आहे. सर्व नागरीकांनी सदर प्रदर्शनास व परवा पोलीस मुख्यालय येथिल परेड ग्राउंडव र भेट दयावी –