खुलेआम गोमास विक्री, खोटे गुन्हे, बलात्कार पीडीतेवरील अन्याय व अवैध धंद्याचा सुळसुळाट ने दौंड तालुका हादरला….. पुलिस वाला गुंडा ची अनुभूती येतेय त्रस्त झालेल्या जनतेला….. दौंड तालुक्यातील पोलिसांच्या जाचाला कंटाळलेल्या नागरिकांना गृहमंत्र्यांकडून मिळणार का न्याय ? हतबल झालेल्या दौंड जनतेचा संतप्त सवाल ?…… शैक्षणिक हब असलेल्या पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात पोलिसांचा नंगानाच व हैदोस….नागरिक, महिला व तक्रारदार हैराण- परेशान….!

पुणे : एकीकडे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्य योगी व महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हिंदुत्वाचा नारा घेऊन सर्वत्र भगवेमय वातावरण करत असताना दुसरीकडे त्यांच्या या उद्देशाला हरताळ फासण्याचे काम दस्तर खुद्द सरस्वतीचे माहेरघर असलेल्या पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्याचे डी.वाय.एस.पी. व पोलीस निरीक्षक करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याबाबत नागरिकांकडून तक्रारींचा पाऊस पडत असतानाही कुठल्याही प्रकारची कारवाई होऊ नये याबाबत समस्त नागरिकांमध्ये कमालीचे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

      भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर आपण सुरक्षित राहू तसेच आपल्या आया बहिणी व गो रक्षण होईल असा समज असताना त्याला हरताळ फासण्याचे काम दस्तर खुद्द दौंड तालुक्यातील डी.वाय.एस.पी. स्वप्निल जाधव, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील व पी आय शेंडगे हे तीन महाभाग करत असल्याचे सचित्र दिसून येत आहे. पोलिस वालाच गुंडा असतो असे आपण चित्रपटातून ऐकत आलो आहोत. परंतु ही म्हण खरी करून दाखवली आहे. ती तेथील मुजोर पोलीस अधिकाऱ्यांनी. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सर्रासपणे गोमांस विक्री होत आहे. असे असतानाही ते पकडून देणाऱ्याला ते आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत आहेत. एवढेच नव्हे तर बलात्कार पीडितेला संरक्षण देण्याचे काम पोलिसांचे असताना देखील त्या घटनेतील आरोपी राजरोसपणे पोलीस ठाण्याच्या आवारात फिरत असतानाही पोलीस मात्र त्याला कुठल्याही प्रकारचा जाब विचारण्यात अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे दौंड तालुक्यात सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणात अवैध धंदे व तक्रारींचा पाढा वाचूनही त्याकडे सपशेल दुर्लक्ष पोलीस करत आहे. विशेष म्हणजे तक्रारदार यांनी अर्ज, उपोषण, आंदोलन करूनही त्याकडे दुर्लक्ष करून आमचं कुणी काही वाकडं करू शकत नाही. अशा अविर्भावात दौंड पोलीस वागत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांचा गुंडाराज येथे सर्वसामान्यांना नागरिकांना दिसून येत आहे. एकीकडे युपी व बिहार मध्ये गुंडाराज खतम होत असताना, महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी असलेल्या पुणे जिल्ह्यात हा प्रकार घडून येत असल्याने मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री व पोलीस अधीक्षक नेमकं करतात तरी काय ? असा सवाल हतबल झालेली व अन्यायग्रस्त जनता विचारताना दिसत आहे.

 

 

 

 

चौकट

*दौंड पोलिसांच्या हुकूमशाहीला वैतागलेल्या नागरिकांनी पोलीस प्राधिकरणाला दिले असंख्य तक्रारी अर्ज* 

 

 

पुणे ता. दौंड येथील डी.वाय.एस.पी. स्वप्निल जाधव, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील व पी आय शेंडगे यांच्या विरोधात पोलीस प्राधिकरणाला दिलेल्या तक्रारी खालील प्रमाणे

 

 

  • १. आकाश भैसडे, गोरक्ष, यांनी चोरीच्या गाई प्रकरणात फिर्याद देऊन्ही पोलिसांनी घेतली नाही तक्रार.

 

  • २. मच्छिंद्र घोलप, दौंड, पुणे यांच्या घरावर मोठया संख्येने समूहाने हल्ला केला. तरी देखील पोलिसांनी मदत केली नाही. उलट जातिवाचक बोलणे करुन धक्काबुक्की केली. कलीम शेख आरोपींना अटक केली नाही. आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला तरी पोलीस अटक करत नाही. जीवे मारण्याची धमकी देतात. त्यामुळे सदर पोलिसावर निलंबनाची कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.

 

  • ३. अश्विनी मुनोत, दौंड यांनी आरोपी विरोधात सदर पोलीस ठाण्यात ३७६ चा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी वसीम शेख याला कोर्ट परिसरात येण्यास बंदी केली असतानाही तो रोजरोसपणे फिरत आहे. माझा जीव धोक्यात असून त्याचा जामीन रद्द करण्यात यावा अशी मागणी अश्विनी यांनी विकली आहे.

 

  • ४. नईम शेख, दौंड, मला जिवे ठार मारण्याची धमकी आरोपीने दिली असून पोलिसांनी माझी तक्रार घेतली नाही. खोट्या केस मध्ये अडकवण्याची पोलीस धमकी देत आहे. 

 

  • ५. अक्षय वाघमारे, दौंड , पोलिसांनी जाणून बुजून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींकडून माझ्या घरावर हल्ला करण्यात आला. तरी देखील पोलीस कारवाई करत नाही. सदर घटनेचा माझ्याकडे व्हिडिओ पुरावा आहे. पोलिसांनी आरोपींकडून लाच घेतल्याचा मला संशय आहे.  

 

  • ६. निखिल शिंदे व स्वप्निल रदवे, बालवीर गणेश मित्र मंडळ दौंड परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून त्यामध्ये वेश्या व्यवसाय, जुगार, मटका, ऑनलाईन कासिनो, चक्री, दारू धंदे, गुटखा, सावकारी अवैधंदे चालू आहेत. व्हिडिओ पुरावे देऊनही कारवाई नाही. अर्ज दिले. आंदोलन केले. उपोषण करूनही पोलिसांनी कारवाई केलेली नाही.

 

  • ७. आकाश पाटील, सागर कदम व नरेंद्र कुलकर्णी, सकल हिंदू समाज यांच्या वतीने करण्यात आलेल्या अर्जा मध्ये असे म्हटले आहे की, शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात गाईंची विक्री व गोमांस वाहतूक सर्रासपणे सुरू असून पोलिसांचे कुरेशी नामक व्यक्तीशी संबंध असून त्या माध्यमातून हे सगळे गैर व्यवहार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!