सिडको परिसरात फक्त भाजपा नगरसेवक मुकेश शहाणे यांच्या ५१ फूटी श्रीरामाच्या देखाव्याचीच चर्चा….!
लाल दिवा-नाशिक,ता .२३ :- पवन नगर मैदानात ५१ फूट श्रीरामाच्या प्रतिक्रुतीचा देखावा त्याखाली राम रामेति रामेति, रमे रामे मनोरमे । सहस्त्रनाम ततुलयं, रामनाम वरानने ।। हा मंत्र ; सोबत भजन संध्येचा लाभ माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी पवननगर मैदान येथे श्रीराम भक्तांना उपलब्ध करून दिला होता.
विशेष म्हणजे हा देखा बघण्यासाठी सिडको परिसरातील तसेच नाशिक शहरातून मोठ्या प्रमाणात राम भक्तांनी गर्दी केली होती. श्रीरामाच्या गाण्यावर अनेकांनी नृत्याचा ठेका देखील धरला. त्यामुळे सिडको परिसरामध्ये केवळ आणि केवळ मुकेश शहाणे यांच्या देखाव्याचीच चर्चा सर्वत्र ऐकायला मिळाली.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1