एम.डी. पावडर हा अंमली पदार्थ विकणारा नाशिकचा ड्रग्ज माफिया सनी अरूण पगारे सह त्याचे साथीदारास ताब्यात घेत सोलापुर येथील अवैध कारखाना केला उध्वस्त…. अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकाची उत्कृष्ट कामगिरी…!
लाल दिवा -नाशिक,दि.२८ : पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे सो, यांचे संकल्पनेतुन निर्माण करण्यात आलेल्या अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकाला नाशिक शहर आयुक्तालय हददीत अवैधरित्या अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे इसमांविरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.
नाशिक रोड पोलीस ठाणे, नाशिक शहर कडील गुरनं ४२५ / २०२३ एन डी पी एस १९८५ चे ८क, २२क, २९ प्रमाणे दिनांक ०७/०९/२०२३ रोजी गुन्हा दाखल असुन, सदर गुन्हयात प्रथमता आरोपी गणेश संजय शर्मा याचे ताब्यातुन १२.५ ग्रॅम वजनाचा मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आलेला होता. सदर गुन्हयाचे तपासात नमुद अंमली पदार्थ हा आरोपी नामे गोविंदा संजय साबळे व आतिश उर्फ गुडडया शांताराम चौधरी यांचेकडुन खरेदी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना नमुद गुन्हयांत अटक करण्यात आली.
तपासादरम्यान नमुद अंमली पदार्थ खरेदी विक्रीचे मोठे जाळे आरोपी नामे सनी अरुण पगारे वय – ३१ वर्षे, रा- गोसावी वाडी, पगारे चाळ, नवीन बिटको हॉस्पिटलवेमागे, नाशिक रोड, नाशिक, व त्याचे साथीदार १) अर्जुन सुरेश पिवाल २) मनोज भारत गांगुर्डे ३) सुमित अरुण पगारे यांचे मार्फत चालवत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यांचा शोध घेवुन त्यांना नमुद गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
सदर आरोपीकडे पोलीस कोठडी दरम्यान सखोल तपास करता आरोपी मनोज भारत गांगुर्डे याचेकडुन ०१ किलो २७ ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ व आरोपी सनी पगारे याचेकडुन ०२ किलो ६३ ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ तसेच आरोपी नामे अर्जुन सुरेश पिवाल याचेकडुन ५८ ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आलेला आहे. आरोपीकडे मिळुन आलेल्या व्यापारी मात्रेतील अंमली पदार्थाच्या अनुषंगाने अधिक तपास करता, त्यांनी सदरचा अंमली पदार्थ हा त्यांचे
साथीदार पाहिजे आरोपी यांचे सोबत संगणमत करून अंमली पदार्थ बनविण्याचा कारखाना सुरू केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. परंतु सदरचा कारखाना त्यांनी कोठे सुरू केला याबाबत माहिती मिळून येत नव्हती. त्यावर विशेष पथकाने तांत्रिक विश्लेषण व सपोनि / फड व पथक यांनी अथक परिश्रम घेवुन गोपनीय बातमी दारामार्फत माहिती संकलित केली. त्यानंतर पोनि / ढमाळ, सपोनि / हेमंत नागरे, सपोनि / धर्मराज बांगर, यांनी सदर गुन्हयातील मुख्य आरोपी सनी पगारे याचे कडे सखोल चौकशी करता त्याने सोलापूर येथे त्यांचा असलेला अंमली पदार्थ निर्मितीचा कारखान्याबाबत माहिती दिली. आरोपीनी सोलापुर येथील रासायनिक कंपनी भाडेतत्वांवर घेवुन, अंमली पदार्थ निर्मितीचा व खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
त्यावर पोनि / ढमाळ, सपोनि / फड, बांगर, नागरे, रोंदळे व पथक यांनी सोलापूर येथे जावुन कारखान्यावर छापा घातला असता, नमुद अटक आरोपी व गुन्हयात पाहिजे आरोपी हे सोलापुर येथे अंमली पदार्थाची निर्मिती करीत असलेल्या कारखाण्यातुन सुमारे ६ किलो ६०० ग्रॅम वजनाचा सुमारे ०३ कोटी ३० लाख रूपये किंमतीचा मुददेमाल त्यासोबत एम डी पावडर सदृश्य अंमली पदार्थ १४ किलो २४३ ग्रॅम वजनाचा सुमारे ०२ कोटी ८४ लाख ८६ हजार रूपये किंमतीचा मुददेमाल तसेच ३० किलो वजनाचा कच्चा माल सुमारे ६० लाख रूपये किंमतीचा मुददेमाल, अंमली पदार्थ निर्मिती करीता लागणारे द्रव रसायन सुमारे १० लाख रूपये किंमतीचे व सुमारे २५ लाखाची साहित्य साधने असा एकुण ७,०९,८६,०००/- किंमतीचा मुददेमाल हस्त करून, अंमली पदार्थ निर्मितीचा कारखाना उध्वस्त करण्यात आला आहे. सदर गुन्हयात अंमली पदार्थ निर्मितीचा कारखाना उभारण्यात सहभाग असलेला नाशिक येथील इसम मनोहर पांडुरंग काळे व सोलापुर येथील एक इसम यांना चौकशी कामी ताब्यात घेतलेले आहे. न अजुनही सखोल तपास सुरू असून अंमली पदार्थाचा कारखाना उभारण्या करीता अटक आरोपी यांना सदर व्यवसायात सक्रिय असलेल्या सराईत गुन्हेगारांचा पाठिंबा असुन त्यांचा गुन्हयातील सहभाग निष्पन्न करून, कठोर कारवाई करण्याची कामगिरी सुरू आहे. सदर गुन्हयात आतापावेतो ०८ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.
- अंमली पदार्थ निर्मितीचा कारखाना उध्वस्त केल्यामुळे नाशिक शहरात होणा-या अंमली पदार्थाचा विक्रीस लगाम घातला आहे..
- विशेष पोलीस पथकाने तपासात आजपावेतो खालील प्रमाणे एम. डी. मॅफेड्रॉन हस्तगत केला आहे
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे साो, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. प्रशांत बच्छाव, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. डॉ. सिताराम कोल्हे यांचे मार्गदर्शनाप्रमाणे पोनि. दिवाणसिंग वसावे, पोनि विजय ढमाळ, सपोनि / हेमंत नागरे, सपोनि. हेमंत फड, सपोनि. डॉ. धर्मराज बांगर, सपोनि. किरण रौंदळ, सपोनि. प्रविण सुर्यवंशी, सपोनि. हेमंत तोडकर, व विशेष पथकातील अंमलदार यांनी कामगिरी केलेली आहे.