नाशिकमध्ये बेकायदेशीर पार्किंगवर कडक कारवाई; आता थेट ‘टोईंग’!

बेकायदेशीर पार्किंग: नाशिककरांनो, सावधान!

लाल दिवा-नाशिक,दि.१ – शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता, नाशिक शहर पोलिसांनी बेकायदेशीर पार्किंगवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. ४ मार्च २०२४ पासून ‘नो पार्किंग’ झोनमध्ये पार्क केलेली वाहने थेट टोईंग करण्यात येणार आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना आता दंड भरण्यासोबतच टोईंग चार्जेसचाही भुर्दंड सोसावा लागणार आहे.

शहरातील अनेक भागात नागरिक वाहतूक नियमांचे पालन करत नसल्याने, रस्त्यांवर बेसुमार पार्किंगमुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.

कुठे जमा होतील टोईंग केलेली वाहने?

टोईंग केलेली वाहने पुढील ठिकाणी जमा केली जातील:

भद्रकाली, मुंबई नाका, सरकारवाडा आणि गंगापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणारी वाहने: सहाय्यक पोलीस आयुक्त, शहर वाहतूक शाखा कार्यालय

नाशिकरोड, उपनगर आणि देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन अंतर्गत येणारी वाहने: युनिट क्रमांक ४, शहर वाहतूक शाखा कार्यालय

नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे आणि ‘नो पार्किंग’ झोनमध्ये वाहने पार्क करू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्यास मदत होईल आणि शहरातील वाहतूक सुरळीत होईल.

(चंद्रकांत खांडवी)

पोलीस उपायुक्त, मुख्यालय/वाहतूक, नाशिक शहर

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
2
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!