नाशिक! येवल्यात हजारो रुपयाचा गुटखा जप्त; अवैध व्यवसायाविरुद्ध मोहीम…! नाशिक ग्रामीण पोलीस विशेष पथकाची उत्कृष्ट कामगिरी…!
लाल दिवा-नाशिक,या.१५: मा. पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामिण यांनी अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी स्थापन केलेल्या विशेष पथकात कार्यरत असलेले अंमलदार पो. हवालदार सागर प्रकाश सौदागर, महिला.पो.शिपाई कल्पना राजाराम लहांगे, पो.शिपाई नितीन हंसराज जाधव, पो. शिपाई मोठाभाउ पोपट बच्छाव, सर्व नेम-पोलीस मुख्यालय, ना. ग्रा सह चा पो. शिपाई हॅमत रामु वाघ नेम. मोटार परीवहन विभाग सध्या मा. पोलीस अधीक्षक सो नाशिक ग्रामीण असे येवला शहर पोलीस ठाणे हद्दीत गस्त करत असतांना मा. हेमंत पाटील साो. पोनि स्थागुशा नाशिक ग्रामिण यांनी कळविलेल्या गुप्तबातमीप्रमाणे खात्री करून छापा कारवाई केली असता
४ वा. चे सुमारास हिंदुस्थानी मश्चिद समोर, हॉटेल हिंदुस्थानीच्या आडोशाला, नागड दरवाजा, येवला ता. येवला जि. नाशिक येथे महिला नामे मुमताज मो अकबर अन्सारी, वय- ५७, वर्षे, रा-११२७, नांदगाव रोड, हिंदुस्थिानी मस्जिद समोर, येवला ता. येवला जि. नाशिक (फरार) ही महाराष्ट्र शासनाचे अधिसुचना क्र. ४९६/७, दि. १८/०७/२०२३ अन्वये महाराष्ट्र राज्यात उत्पादन, साठा वितरण व साठ्यास प्रतिबंधीत असलेला वरील प्रमाणे सुंगधित तंबाखु व जर्दा/गुटखा सदृष्य मालाचा साठा विक्रीकरणेचे उददेशाने एकुण रू. २७४४०/-चा माल मिळुन आला. सदर माल हा मानवी शरीरास अपाय कारक व हानिकारक असल्याचे माहीत असतांना सुध्दा स्वतःचे आर्थिक फायदयासाठी साठा व विकी करतांना मिळून आले. रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते