मराठी पत्रकार परिषदेचा बीडमध्ये मराठवाडा विभागीय मेळावा….!

लाल दिवा : मराठी पत्रकार परिषद बीड जिल्हा शाखा आणि परळी शाखेच्यावतीने 4 जून 2023 रोजी एम. आय.डी.सी.बीड येथील वैष्णवी मंगल कार्यालयात मराठवाड्यातील पत्रकारांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे..

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्ते तथा निर्भय बनो आंदोलनाचे नेते 

 डॉ. विश्वंभर चौधरी, असिम सरोदे आणि परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख उद्घाटन सत्राचे प्रमुख पाहुणे असतील..

सकाळी 9.30 वाजता मेळाव्याचे उद्घाटन करण्यात येईल.. यावेळी माणिकराव देशमुख सामाजिक विकास प्रतिष्ठान च्यावतीने दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल.पत्रकार भूषण पुरस्कार लोकप्रश्नचे संपादक दिलीप खिस्ती, कृषी भूषण पुरस्कार कल्याण कुलकर्णी यांना तर समाज भूषण पुरस्कार मनिषाताई तोकले यांना जाहीर झाला आहे. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येईल.. यावेळी विश्वंभर चौधरी आणि असिम सरोदे यांचे “निर्भय बनो आंदोलनातील पत्रकारांची भूमिका” या विषयावर व्याख्यान होईल..

परिषदेच्या जिल्हा शाखेच्या नवनिर्वाचित पदाधिकारयांचा यावेळी सत्कार करण्यात येईल.

दुपारच्या सत्रात असिम सरोदे *पत्रकार आणि कायदा* या विषयावर मार्गदर्शन करतील.

दुपारी 3 ते ४.३० या वेळेत समारोप होईल.. आमदार संदीप क्षीरसागर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोल- मुंडे, मुख्याधिकारी अजित पवार, जिल्हा पोलीस प़मुख श्रीनंदकुमार ठाकूर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे आदि मान्यवर मार्गदर्शन करतील .

या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष विशाल साळुंके, कार्याध्यक्ष सतीश बियाणी,जिल्हा सरचिटणीस प्रा.राजेंद्र बरकसे,जिल्हा उपाध्यक्ष रवी उबाळे, कोषाध्यक्ष छगन मुळे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संजय हांगे, यांनी केले आहे.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!