नाशिक ट्रॅफिक “लेडी सिंघम” ची भद्रकाली पोलीस ठाण्यात बदलीने नाराजी …!
लाल दिवा-नाशिक सिडको, ता. १३ : गेल्या दोन वर्षात वाहतूक शाखेमध्ये आपला धबधबा निर्माण करून मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करत आपला धाक निर्माण करणाऱ्या नाशिक ट्रॅफिक लेडी सिंघम च्या भूमिकेत असलेल्या छाया देवरे यांची भद्रकाली पोलीस ठाण्यात बदली झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून सहाय्यक पोलीस निरीक्षक छाया देवरे यांनी वाहतूक शाखेमध्ये मोठ्या प्रमाणात दबदबा निर्माण केला होता. त्यांच्या पुढाकाराने पाथर्डी फाटा येथे सिग्नल व्यवस्था कार्यान्वित झाली होती. जड वाहतूक व्यवस्था त्यांनी चांगलीच नियंत्रणात आणली होती. अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये त्यांनी वाहतूक मार्ग सुरळीत केला होता. अवैध पार्किंगला त्यांनी आळा घातला होता. एवढेच नव्हे तर शहर वाहतूक शाखा युनिट ३ च्या पोलीस चौकीसाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न देखील केले होते. यापूर्वी त्यांनी अंबड पोलीस ठाण्यात निर्भया पथकाचे काम मोठ्या हिमतीने केले होते. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांना वरिष्ठ स्तरावर चांगलीच शाबासकी मिळाली होती. निर्भया पथकात “डॅशिंग लेडी” म्हणून त्यांच्याकडे बघितले जात होते. एवढेच नव्हे तर शाळा महाविद्यालयामध्ये जाऊन त्यांनी विद्यार्थी व विद्यार्थिनींना प्रबोधन करण्याचे काम केले आहे. शहर वाहतु शाखा युनिट ३ च्या मधून बदली झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे..