नाशिकरोड पोलिस दमदार…२९ कारवायांसह २३, हजार रुपये दंड वसूल…!
लाल दिवा-नाशिक,ता.२९:मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे आदेशानुसार नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीत आज ७ ते १० वाजताच्या दरम्यान सैलानी बाबा चौक, जेलरोड भागात टवाळखोर इसम, मद्यपी तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे, कर्णकर्कश हॉर्न वाजवणारे
टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली असून या कारवाईमध्ये नाशिकरोड पोलीस स्टेशनचे तीन अधिकारी, बारा अंमलदार सामील झाले होते यादरम्यान बारा इसमांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 112/117 नुसार वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे इसमांवर २९ कारवाया करण्यात आल्या असून एकूण 23 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. कारवाई दरम्यान मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ २, मा. सहायक पोलीस आयुक्त, नाशिकरोड विभाग यांनी भेट देवून मार्गदर्शन केले…
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
1
+1