नाशिकरोड पोलीसांची कारवाई……वेगवेगळ्या गुन्हयांमध्ये ०६ आरोपी अटक, चोरीस गेलेल्या ५० सिमेंटच्या गोण्या तसेच ११,२०० रुपयांचा नायलॉन मांजा जप्त …. एक् आरोपीकडून धारदार कोयता जप्त…..!

लाल दिवा-नाशिक,ता.१० : -मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे आदेशान्वये नाशिक शहरात दहशत निर्माण करणारे, चोरी घरफोडी करणारे, तसेच नायलॉन मांजाची विक्री करणा-या इसमांचा शोध घेवून कारवाई करण्याबाबत आदेशीत केलेले होते त्यानुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रामदास शेळके यांचे मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलीसांनी मागील आठवडाभरात खालीलप्रमाणे कारवाई केलेली आहे.

 

१. दि. ०१/०१/२०२४ रोजी फिर्यादी नामे प्रितेश शिवनारायण सोमानी वय ३८ वर्षे, रा. निलगीरी सोसायटी, दत्तमंदिर,

नाशिकरोड, नाशिक यांनी त्यांचे ट्रक एम. एच. ४६ एफ ६०४१ मधून सिमेंटच्या १०० गोण्यांची चोरी झाल्याबाबत तक्रार दिल्याने नाशिकरोड पोलीस ठाणे येथे गु.र.क्र ०२/२०२४ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने नाशिकरोड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रामदास शेळके यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सुचित केलेले होते. त्यानुसार नाशिकरोड पोलीस ठाणेचे गुन्हे शोध पथकातील सपोनि गणेश शेळके, पोहवा /१८०८ विजय टेमगर व पथक यांना गुन्हयाचे तपासात सदर गुन्हा हा आरोपी नामे गुड्डू उर्फ आयुब पठाण नुर महोम्मद याने केल्याचे निष्पन्न झाल्याने पोशि/२०७२ मनोहर कोळी, पोशि/२०४ अरुण गाडेकर, पोशि/५४ नाना पानसरे व पोशि/ २५५० भाउसाहेब पानसरे यांनी आरोपीचा शोध घेवून त्यास अटक करून आरोपीकडून ५० सिमेंटच्या गोण्या जप्त करून गुन्हा उघडकीस आणला आहे.

२. दि. ३१/१२/२०२४ रोजी ३१ डिसेंबरच्या पार्श्वभुमीवर लावण्यात आलेल्या बंदोबस्तादरम्यान गुन्हे शोध पथकाचे अधिकारी अंमलदार पेट्रोलिींग दरम्यान नाशिकरोड पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये एक इसम कोयता घेवुन दहशत निर्माण करीत आहे अशी बातमी मिळाल्याने सपोनि गणेश शेळके व अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावून इसम नामे हितेश सुभाष डोईफोडे वय-२४ वर्षे, रा. पेढारकर कॉलनी, जेलरोड, नाशिकरोड, नाशिक यास कोयत्यासह ताब्यात घेवुन त्याचेविरोधात नाशिकरोड पोरटे गु.र.क ०१/२०२४ हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

 

३. दि. ०२/१२/२०२३ रोजी नाशिकरोड पोलीस स्टेशन हद्दीत दरोडयाच्या तयारीत असणा-या आरोपीचा पाठलाग करून नाशिकरोड गुन्हे शोध पथकाने दोन आरोपींना अटक करून गु.र.क. ५४३/२३ भादवि ३९९, १८८ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. गुन्हयातील तीन आरोपी हे गुन्हा घडल्यापासुन फरार होते. सदर गुन्हयाचे तपासी अधिकारी सपोनि / गणेश शेळके व गुन्हे शोध पथकाचे अंमलदार हे तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करीत असतांना दि. ३१/१२/२०२३ रोजी व दि. ०१/०१/२०२४ रोजी तीन संशयित आरोपी नामे १) सुरज संजय काकडे रा. पवारवाडी, नाशिकरोड, नाशिक २) रोहन सुभाष जाधव रा. गाडेकर मळा, नाशिकरोड, नाशिक ३) हितेश सुभाष डोईफोडे रा. पेंढारकर कॉलनी, जेलरोड, नाशिकरोड, नाशिक यांचा शोध घेवुन त्यांच्याकडे कौशल्यपुर्ण तपास केला असता त्यांनी नमुद गुन्हयाची कबुली दिली. त्यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली असून आरोपींकडे अधिक तपास सपोनि / गणेश शेळके करीत आहेत.

 

४. मा. पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी नाशिक शहरात नायलॉन मांजा खरेदी व विकी करणारे इसमांवर कारवाई करणेबाबत आदेशितत केले होते. त्यानुसार मा. र मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नाशिकरोड पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे अधिकारी अंमलदार यांनी नायलॉन मांजाची विक्री करणारे आरोपी नामे साईल मंगेश लोहारकर रा. सैलानीबाबा, जेलरोड, नाशिकरोड, नाशिक आणि मेहुल महेश उगरेजीया रा. जेलरोड, नाशिकरोड, नाशिक यांचेवर छापा टाकून त्यांचेकडून

११,२००/- रूपयांचा नायलॉन मांजा जप्त करून त्यांचेविरुध्द नाशिकरोड पोलीस ठाणे येथे गु.र.क्र. ६३७/२०२३ आणि गु.र.क्र. १०/२०२४ भा.द.वि. कलम १८८, सह पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम ५, १५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सदर कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णीक, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२ श्रीमती मोनिका राउत, व मा. सहा. पोलीस आयुक्त, नाशिकरोड विभाग श्री. आनंदा वाघ यांचे मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रामदास शेळके, गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश शेळके, पोहवा /१८०८ विजय टॅमगर, पोहवा / ८३० विष्णु गोसावी, पोशि/१९५० सागर आडणे, पोशि/गोकुळ कासार, पोशि/२२५५ कल्पेश जाधव, पोशि/२२६० रोहित शिंदे, पोशि/२०४ अरुण गाडेकर, पोशि/२०७२ मनोहर कोळी, पोशि/५४ नाना पानसरे, पोशि/१५४२ यशराज पोतन, पोशि/संतोष पिंगळ, चापोशि/रानडे अशांनी केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!