नाशिक रोड ला गोरेवाडीत जादुटोण्याचा प्रयत्न अनिस पोलीस संरक्षनात बाहुल्या काढणार
लाल दिवा,ता.२४: नाशिक रोड
नाशिक रोडला गोरेवाडीत जादूटोण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे नागरिक भयभीत झालेले असून बाभळीच्या झाडाला लावलेल्या लिंबू मिरच्या बाहुल्या आणि मनातील इच्छा चमचकूर असलेल्या चिठ्या आढळून आले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या हा लक्षात आल्यानंतर अनिश्चित कार्यकर्त्यांनी तात्काळ गोरेवाडी धाव घेऊन पोलीस संरक्षणात झाडावरच्या बाहुल्या उतरवल्या जातील यासाठी पोलिसात तक्रार दिली आहे.
नाशिक रोड ला गोरेवाडी शाळेच्या दहाचाळच्या कडेला रेल्वे रुळाजवळ असलेल्या बाभळीला खिळ्याच्या सहाय्याने ठोकलेल्या काळ्या बाहुल्या, लिंबू, नारळ, उडीद, बिबा,मिरच्या,कोहळा आदी वस्तू गुरुवार (दि.२०) अमावस्याच्या दिवशी नागरिकांना आढळल्या.
या ठिकाणी मनातील इच्छा असणारा मचकुर लिहिलेल्या चीठया आढळल्या आहेत.दुष्मानाचा फोटो, त्याचे नाव माच्कुरात लिहिलेले आहे. वहीच्या कागदावर सदर मच्कुर लिहिला आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये भीती पसरली आहे. करणी, भानामती, भूतबाधा असल्याचा प्रकार प्रथम दर्शनी नागरिकांमध्ये चर्चिला जात आहे.अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी घटना स्थळावर भेट देऊन हा प्रकार समजून घेतला आहे.या बाहुल्या नेमक्या कोणी लावल्या या संदर्भात अनिस चे कार्यकर्ते गुप्त पद्धतीने शोध घेत आहे. या प्रकारामुळे येथील नागरिक भयभीत झाले आहेत.या संदर्भात अनिस ने नाशिक रोड पोलिसांना हा प्रकार सांगितला असून पोलीस संरक्षणात बाहुल्या काढण्याची विनंती केली आहे.
जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल होऊन संशयित सदर गैर प्रकाराला उतेजना देणारा बाबा,बुवा, भगत पकडून कारवाईची मागणी सामान्य रहिवासी करीत आहे.
प्रतिक्रिया –
आम्ही पोलिसांना निवेदन दिलेले असून पोलीस संरक्षणात बाहुल्या काढण्याची विनंती केली आहे पोलिसांनी संशयित भक्ताला पकडून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सुदेश घोडेराव कार्याध्यक्ष