नाशिक रोड! अवघ्या १५ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नराधमांवर व १० जणांवर नाशिक रोड पोलिसांची मोठी कारवाई…..!
लाल दिवा-नाशिक,ता.२८:-अल्पवयीन मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 10 जणांविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 27 ऑगस्ट रोजी अनुष्का विवेक जाधव वय 15 राहणार तक्षशिला शाळेसमोर राजवाडा, देवळाली गाव नाशिक रोड असे मृत मुलीचे नाव असून या प्रकरणी तिच्या आईने फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुलाब वाडीतील समाजमंदिरातसमोर राहणारा कलाम इजहार मंजुरी व त्याची आई जहाँगीर शेख बबलू शेख, मुन्ना शेख, लादेन मंजुरी, तमिळ, बबलू शेख नंदा.
मन्सुरी शेख अंजुम सय्यद, साहिल सय्यद अशी गुन्हा दाखल केलेल्या संशयितांची नावे आहे. मृत मुलगी ही 10 वी पर्यंत तपशीला शाळेंत शिकावयास होती. महाविद्यालयीन शिक्षणासाठीने देवळाली कॅम्प भाटिया कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता.
शाळेत असताना कलाम हा तिला त्रास देत होता. माझ्याशी बोल माझा मोबाईल नंबर घे माझ्याशी लग्न कर असे तो सारखे तिला बोलत आहे. काल आमचे घरचे देखील या मुलीला कलामशी लग्न केले नाही तर तुझ्या कुटुंबीयांना सोडणार नाही असे धमकावत असल्याची.
फिर्यादित म्हटले आहे. नेहमीच्या त्रासाला कंटाळून मुलीने कला मन्सुरी याच्या घरी जाऊन दिनांक 23 ऑगस्ट रोजी विषारी औषध सेवन केले. अजून सय्यद आणि साहिल सय्यद या दोघांनी दुचाकीवर बसून नवीन बिटको रुग्णालयात औषध उपचारासाठी दाखल केले.
त्यावेळी अंजुम सय्यद या महिलेने मुलीच्या आईला फोन करून सांगितले की तुमची मुलगी विहतगाव पुलावर चक्कर येऊन पडली. आम्ही तिला बिटको हॉस्पिटल मध्ये दाखल केले आहे. तुम्ही लवकर नवीन बिटको हॉस्पिटल मध्ये.
मुलीची आई हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी मुलीला तपासून औषधे दिली. त्यानंतर मुलगी आईसोबत घरी येत असताना तिला रस्त्यातच उलटी आणि जुलाब होऊ लागले. त्यामुळे आईने मुलीला विचारले असता तिने दररोजच्या छेडखानीला कंटाळून विषारी औषध घेतल्याचे सांगितले.
तिच्या तोंडातून फेस येत असल्याने आईने तातडीने तिला नाशिक तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले, पण तिची प्राणज्योत मालवली होती, असे फिर्यादीत म्हटले आहे.
प्रतिक्रिया
हा मुद्दा अत्यंत गंभीर आणि संवेदनशील आहे. अल्पवयीन मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या या प्रकरणात 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे, आणि अनेक जण तिच्या त्रासात समाविष्ट आहेत. या प्रकारांच्या पार्श्वभूमीवर समाजातील भावनिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
विशेषतः, या प्रकरणात दाखल झालेल्या कल्पनांकडे लक्ष देणे आवश्यक आहे, जसे की मुलीवर शालेय काळात होत असलेल्या छेडछाडीच्या कृत्यांचे गंभीर परिणाम, तसेच तिच्यावर असलेल्या दबावामुळे निर्माण झालेला मानसिक त्रास.
मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, कलाम याने मुलीला अनेकदा त्रास दिला होता, ज्यामुळे तिच्या मनस्थितीत बदल झाला आणि तिने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. हे दर्शवते की, धमकावणे, छेडछाड करणे आणि मानसिक त्रास यामुळे अल्पवयीन मुलांच्या जीवनावर किती वाईट परिणाम होऊ शकतात.
या प्रकरणात न्यायाच्या मागणीसाठी आणि अशा प्रकारच्या घटनांना थांबवण्यासाठी योग्य पाऊले उचलण्याची मागणी केली जात आहे. तसेच, परिवाराकडे जर अशा प्रकारच्या कृत्यांची माहिती आली, तर तात्काळ मदतीसाठी संपर्क साधणे महत्त्वाचे आहे. समाजाच्या सर्व घटकांनी एकत्र येऊन याबाबत जागरूकता वाढवावी आणि सुरक्षित वातावरण निर्माण करावे, ज्यामुळे अल्पवयीन मुलींना संरक्षण मिळेल
विनोद सुभाष थोरात
पूर्व जिल्हा मंत्री विश्व हिंदू परिषद. नासिक जिल्हा