विधी संघर्षित बालकांना गुन्हेगारीपासून प्रवृत्त करण्यासाठी….. नाशिकच्या पोलीस आयुक्तांचे एक पाऊल पुढे….. आयुक्तांच्या भूमिकेबाबत नागरिकांनी केले स्वागत….!
लाल दिवा-नाशिक,ता.८ :- नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील दाखल गुन्हयांमध्ये विधी संघर्षीत बालकांचा वाढता सहभाग लक्षात घेवुन त्यांचे मनोवृत्तीचा तज्ञ व्यक्तींच्या मदतीने अभ्यास केला असता सोशल मिडीया वरील भाईगिरीच्या रिल्स पाहणे, सराईत गुन्हेगारांचे अनुकरण करणे इत्यादी कारणांमुळे विधी संघर्षीत बालक विविध प्रकारचे गुन्हे करण्यास प्रवृत्त होतांना दिसुन येत आहेत.
विधी संघर्षीत बालकांच्या अभिलेखांचा अभ्यास करून तसेच त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून ते विविध गुन्हयांकडे का आकर्षित होतात, याबाबींचा अभ्यास करणे आणि त्यांना गुन्हयांपासुन परावृत्त करून त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण करावे आणि भविष्यकाळात त्यांना करिअरच्या संधी उपलब्ध व्हाव्यात व त्यांनी सुजान नागरीक म्हणुन समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे, यासाठी बाल न्याय मंडळ (JJB), समुपदेशन करणा-या एन.जी.ओ., शासकीय विभागांचे प्रतिनिधी, एम.आय.डी.सी. सारख्या उदयोग व्यवसायातील प्रतिनीधी आणि नाशिक शहर पोलीस दल यांच्या एकत्रीत प्रयत्नातुन विधी संघर्षीत बालकांना गुन्हयांपासुन परावृत्त करण्यासाठी पुढील प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
सदर परिपत्रकाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस स्टेशन स्तरावर यापुर्वीचे परिपत्रक २/२०२४ क. पो.आ/वाचक/परिपत्रक/८४/२०२४ नाशिक शहर दि.२९/०२/२०२४ अन्वये नेमण्यात आलेले समन्वय अधिकारी हे पोलीस स्टेशन हददीतील गुन्हयांमध्ये सहभागी विधी संघर्षित बालके यांना त्यांच्या वृत्तीत सुधारणा व्हावी, त्यांनी भविष्यकाळात गुन्हा करण्यापासून परावृत्त व्हावे, त्यांचे शिक्षण पूर्ण होवून त्यांनी अर्थारजनासाठी चांगले साधन मिळवून समाज प्रवाहात चांगले नागरिक म्हणून पदार्पण करावे याकामी विधी संघर्षित बालकांसाठी बाल न्याय मंडळ, एन.जी.ओ., समुपदेशक, शासकीय विभागांचे प्रतिनिधी, एम.आय.डी.सी. सारख्या उदयोग व्यवसायातील प्रतिनीधी इत्यादींच्या मदतीने विधी संघर्षित बालकांच्या मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित करणे, त्यांना पुर्न: वसनासाठी शासकीय योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी अथवा खाजगी नोक-यांमध्ये सहभाग मिळवून देण्यासाठी समन्वय अधिकारी यांनी दुवा म्हणून कामकाज करावे.
समन्वय अधिकारी यांनी पोलीस स्टेशन अभिलेखावरील विधीसंघर्षीत बालकांची यादी अद्यावत करून विधीसंघर्षीत बालकांच्या गुन्हयांच्या वर्गवारी नुसार विधी संघर्षीत बालकांचे अ, ब, क अशा याद्या मध्ये वर्गीकरण करावे. त्याचप्रमाणे १८ वयोगटापर्यंतची वेगळी यादी व १८ ते २१
वयोगटातील बालकांची वेगळी यादी तयार करावी.
सदर वर्गीकरणा नंतर त्या-त्या वर्गीकरणामधील गुन्हा करण्याच्या पध्दतीनुसार त्यांच्या कार्यशाळा आयोजित करण्याचे नियोजन करावे.
विभागीय सहायक पोलीस आयुक्त, हे त्यांच्या विभागातील पोलीस स्टेशन मधील विधीसंघर्षीत बालकांच्या महिन्यातून एकदा कार्यशाळा आयोजित करतील. त्यामध्ये बाल न्याय मंडळ (JJB), समुपदेशन करणा-या एन.जी.ओ., शासकीय विभागांचे प्रतिनिधी, एम.आय.डी.सी. सारख्या उदयोग व्यवसायातील प्रतिनीधी आणि नाशिक शहर पोलीस दल यांना सहभागी करून घेतील. सदरच्या कार्यशाळा पंचवटी विभागात पंचवटी पोलीस स्टेशन येथे, सरकारवाडा विभागात भद्रकाली पोलीस स्टेशन येथे, अंबड विभागात अंबड पोलीस स्टेशन येथे व नाशिकरोड विभागात नाशिकरोड पोलीस स्टेशन येथे समन्वय अधिका-याच्या मदतीने आयोजित कराव्यात.
समन्चय अधिकारी यांनी ज्या-ज्या वेळी एखाद्या विधीसंघर्षीत बालकास वैयक्तीक स्तरावर समुपदेशन करावयाचे असेल त्या-त्या वेळी पोलीस स्टेशनला जबाबदारी सोपविलेल्या समुपदेशकाशी संपर्क साधुन त्यांचेकडून विधी संघर्षित बालकाचे समुपदेशन करून घेण्याची कार्यवाही करावी. त्यानंतर विधी संघर्षित बालकाच्या कुटुंबियांच्या संपर्कात राहून त्याचे वर्तनावर लक्ष ठेवावे, त्यासाठी एक पोलीस अंमलदारास पालक म्हणून नियुक्त करावे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी परिशिष्ठ ‘अ’ व परिशिष्ठ ‘ब’ मध्ये नमुद समुपदेशक यांच्या व्यतिरिक्त आपले पोलीस स्टेशन हद्दीतील इतर समुपदेशक, एन.जी.ओ. तसेच स्वेच्छेने सदर उपक्रमात सहभागी होवु इच्छीणा-या तज्ञ व्यक्तींना सहभागी करून घ्यावे.
पालक म्हणून नेमलेल्या पोलीस अंमलदाराने विधी संघर्षित बालकाशी प्रथम आपला संपर्क वाढवून त्याला कौशल्याने हाताळून त्यास विश्वासात घ्यावे. दोन-चार दिवसांनी त्याची भेट घेवून त्याच्या घरगुती तसेच इतर कार्यक्रमांमध्ये प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग घ्यावा. सदरची कारवाई करतांना पालक म्हणून नेमलेल्या अंमलदाराने साधे कपडे परिधान करावेत.
विधी संघर्षित बालकासाठी पालक म्हणून नियुक्त केलेल्या अंमलदारांबाबतची माहिती पोलीस स्टेशन स्तरावर पुढील दिलेल्या तक्त्याप्रमाणे अद्ययावत करावी