नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ रजि. सलग्न नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाची नूतन कार्यकारणी जाहीर… अध्यक्षपदी करणसिंग बावरी तर कार्याध्यक्षपदी लियाकत पठाण…..!
लाल दिवा-नाशिक,दि.३० : पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी एकमेव (रजि) संघटना असलेली नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.
नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ (रजि) संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार, जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब बोरगुडे यांच्या आदेशाने जिल्हा सरचिटणीस तथा निवडणूक अधिकारी दिनेशपंत ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक तालुका पत्रकार संघाची द्वैवार्षिक (सन २०२४-२०२५) निवडणूक घेण्यात आली. या निवडणूकीत एका पदासाठी एकच अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत नवीन कार्यकारणी घोषित करण्यात आली ती पुढील प्रमाणे
- • नूतन कार्यकारिणी •
- अध्यक्ष – करणसिंग रामसिंग पवार बावरी
- कार्याध्यक्ष – लियाकत पठाण सर
- उपाध्यक्ष सौ. संगीता पाटील व पंकज पाटील
- सरचिटणीस – डॉ. राकेश श्रीवंश
- सह सरचिटणीस – अब्दुल कादिर
- खजिनदार – प्रवीण गोतीसे
- सह खजिनदार – तेजश्री उखाडे
- संघटक – भैय्यासाहेब कटारे
- सहसंघटक – जनार्दन गायकवाड
- समन्वयक – विश्वास लचके
- कार्यकारणी सदस्य – राकेश पाटील, तौसिफ शेख, वकार खान, दिनेश पगारे
या सर्व नूतन कार्यकारणीस जिल्ह्यातील सर्व कार्यकारणी तथा तालुक्यातील सर्व पत्रकार सदस्यांनी अभिनंदन करीत भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
प्रतिक्रिया,
पत्रकारांच्या नाय हक्कासाठी स्थापन करण्यात आलेल्या या मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदाचा मान मला मिळाला आहे मला मिळालेल्या संधीचे मी सोने करेल व पत्रकारांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सदैव्य तत्पर राहील. माझ्यासाठी पद महत्त्वाचे नसून काम महत्त्वाचे आहे म्हणून सर्वांना सोबत घेऊन पत्रकारांचे प्रश्न मांडण्याची भूमिका माझी असेल
- करणसिंग बावरी
- अध्यक्ष
- नाशिक तालुका मराठी पत्रकार संघ