नांदगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर होणार..!
लाल दिवा-नाशिक,ता.९: मुंबई आज राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री मा. अनिल पाटील यांची भेट घेत. नांदगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. नांदगाव तालुक्यात अपेक्षेपेक्षा पाऊस कमी झाला आहे. पेरणीनंतर पावसाचा खंड पडल्याने असंख्य शेतकऱ्यांना दुबार पेरण्या कराव्या लागल्या आहेत. मात्र सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात देखील पाऊस झाला नाही. त्यामुळे बळीराजा आस्मानी संकटात सापडला आहे. त्यामुळे नांदगाव तालुक्यात दुष्काळ घोषित करण्याची मागणी पंकज भुजबळ यांनी मंत्री अनिल पाटील यांच्याकडे संपूर्ण नांदगावच्या जनतेच्या वतीने केली.
त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना देखील याबाबत पत्रव्यवहार केला आहे. नांदगावची परिस्थिती पाहता तातडीने आज याठिकाणी दुष्काळ जाहीर करण्यात येईल असे आश्वासन ना. अनिल पाटील यांनी दिले….
- पंकज भुजबळ माजी आमदार-नांदगाव मनमाड विधानसभा मतदारसंघ